News 34 chandrapur
राजुरा : तो वेडसर प्रवृत्तीचा होता, वेडेपण्यात तो कुणालाही शिवीगाळ व मारहाण करायचा, शेजारी राहणाऱ्या महिलेला त्याने मारहाण केली मात्र त्या मारहाणीनंतर त्या वेडसर इसमाला दोघांनी यमसदनी पाठविले.
राजुरा शहरातील रमाबाई नगर येथे राहणाऱ्या 60 वर्षीय सुमन गजभिये यांचा 40 वर्षीय मुलगा नरेश गजभिये याला वेडसरपनाने ग्रासले होते, नरेश हा येता जाता कुणालाही शिवीगाळ करायचा, मात्र तो वेडसर असल्याने त्याच्याजवळ कुणी लक्ष देत नव्हते.
पण 12 एप्रिलला नरेश ने शेजारी राहणाऱ्या आशा आगलावे यांच्या घरी जात त्यांना मारहाण केली, सदर बाब त्यांनी आपले पती विठ्ठल शंकर आगलावे यांना सांगितली. Crime news
रागाच्या भरात विठलं आगलावे व प्रदीप माणुसमारे यांनी नरेशच्या घरी जात त्याला पकडून नरेशचे हात-पाय बांधत पलंगाला बांधले, त्यानंतर दोघांनी नरेशच्या आईसमोर त्याला लाथा बुक्यांनी मारहाण केली, या मारहाणीत नरेशचा मृत्यू झाला. Cracked young man beaten
नरेशच्या आईने त्याला रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला मात्र नरेश मृत्युमुखी पडला होता.
सुमन गजभिये यांनी याबाबत राजुरा पोलीस स्टेशन गाठत दोघांविरोधात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी गुन्हा दाखल करीत दोन्ही आरोपींना अटक केली. Beating the child in front of the mother
पुढील तपास राजुरा पोलीस करीत आहे.
