News 34 chandrapur
चंद्रपूर - मोबाईल टॉवर च्या कंट्रोल रूम मधून DR युनिटची चोरी करणाऱ्या 2 आरोपींना रामनगर पोलिसांनी अटक केली असून सदर आरोपी कडून तब्बल 9 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सध्या गुन्हेगारांनी चोरी करण्यासाठी आता मोबाईल टॉवर ला केंद्रित करणे सुरू केले आहे. mobile phone tower
निर्जनस्थळी असलेल्या मोबाईल टॉवरच्या सुरक्षेसाठी कुणी नसल्याने त्या ठिकाणी चोरीचा गुन्हा सहजरित्या करणे शक्य होते. mobile tower
नागपुरातील 2 आरोपी या चोरीत सहभागी असून जिल्ह्यात 6 पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक मुळे यांनी दिली आहे.
मोबाईल टॉवर वर असंख्य मोबाईल चे सिग्नल निर्धारित क्षेत्रात पसरविण्यासाठी सदर DR युनिटचा वापर केला जातो, त्या DR युनिटची किंमत जास्त असल्याने व निर्जन ठिकाणी विविध मोबाईल कंपनीचे टॉवर मध्ये DR युनिट सहज उपलब्ध होत असल्याने चोरांना त्याच्यावर सहज हात साफ करता येतो. cellphone tower
नागपूर येथील 24 वर्षीय हर्षवर्धन गेडाम, सम्यक कळसकर या दोघांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून 2 चारचाकी वाहन सहित कटर व DR युनिट स्थानिक गुन्हे शोध पथकाचे सपोनि हर्षल एकरे यांनी जप्त केले. phone tower
या चोरी प्रकरणात रॅकेट तर सक्रिय नाही न याचा सुद्धा तपास केल्या जात आहे.
