News 34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथे मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम जन्म उत्सव(रामनवमी)मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या निमित्ताने श्रीराम नवमी जन्म उत्साह व शोभायात्रा समिती गडचांदूरच्या वतीने शहरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.वार्ड क्रमांक 3 येथील राम मंदिर व हनुमान मंदिर येथून ढोलताशेच्या गजरात शोभायात्रेला सुरूवात करण्यात आली.महात्मा फुले चौक,शेडमाके चौक,संविधान चौक,गांधी चौक,शिवाजी चौक असा प्रवास करत माता मंदिर जवळ शोभायात्रेची समाप्ती झाली. Shriram navami
या दरम्यान जय श्रीराम च्या घोषणेने शहर अक्षरशः दुमदुमले. लहानांपासून,वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनीच शोभायात्रेत सहभाग नोंदवला.पारंपारिक पद्धतीने वेष परिधान करून व फेटे बांधून महिलांची उपस्थिती उल्लेखनीय होती.यावेळी तरूणांचा उत्साह वाखानण्याजोगा होता. राम,लक्ष्मण,सीता, हनुमानाच्या वेषात असलेले लहानग्यांनी तसेच आकर्षक रोषणाई व ढोलताशांच्या तालावर नृत्य करीत असलेल्या तरुणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.गेल्या दोन वर्षात कोरोना संकटामुळे सर्व धार्मिक सण उत्सव,विवीध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती.मात्र यंदा हे संकट कमी झाल्याने सर्व समाजाचे धार्मिक सण उत्सव मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरे केले जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. Jay shri ram
वास्तवीक पाहता गडचांदूर शहर हे अतिशय शांत व सर्वधर्म समभावचे जीवंत उदाहरण असून येथील नागरिक आपापले सण,उत्सव मिळून मिसळून साजरे करतात."रामजीच्या शोभायात्रेत,ख्वॉजा'' जी नामक धुमाल पार्टी,हे तर हिंदु मुस्लिम एकतेचे अदभुत दर्शनच, अशी चर्चा यात्रे दरम्यान काही सुज्ज्ञ प्रक्षकांकडून ऐकायला मिळत होती."मज़हब नही सिखाता आपसमे बैर रखना,हिंदी है हम वतन है, हिंदोस्तां हमारा" याप्रसंगी असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.शोभायात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.एकुणच हा उत्सव मोठ्या हर्षोल्हास व उत्साहाने साजरा करण्यात आला.
