News 34 chandrapur
चंद्रपूर - शहरातील SP लॉ कॉलेज समोर एका अज्ञात व्यक्तीचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाल्याने परिसरात एकचं खळबळ उडाली आहे.शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय, तुकूम समोर असलेल्या भिंतीजवळ वय अंदाजे 55 ते 60 वर्षे असलेल्या अज्ञात इसमाचा अर्धवट जळलेला मृतदेह मिळाला. Breaking News
घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी पोहचत तपास सुरू केला, त्या जळालेल्या मृतदेहाजवळ एक दुचाकी वाहन आढळले आहे, लॉ कॉलेज समोरील हा परिसर झाडी झुडपाच्या मध्ये असल्याने काही अनुचित प्रकार घडल्यास कुणालाही याबाबत माहिती मिळत नाही. Partially burnt corpse
काही वर्षांपूर्वी याच परिसरात अज्ञात व्यक्तीचा पाय आढळून आला होता, तो पाय कुणाचा याचा पत्ता अजून लागलेला नसून आता अर्धवट जळलेला मृतदेह मिळाल्याने पोलिसांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. Chandrapur law college
त्या व्यक्तीची आत्महत्या की हत्या याबाबत पोलीस तपास करीत आहे.
