News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा चंद्रपूर, तालुका मुलच्या पदाधिकारी यांनी जागतिक वसुंधरा दिनानिमित्त मुल तालुका टीम तर्फे वेगवेगळ्या ठिकाणी विविध प्रकारच्या बियांचे रोपण तसेच वृक्षारोपण करण्यात आले.
नागपूर विभाग अध्यक्षा सौ.रत्ना चौधरी यांनी तालुका पदाधिकारी आणि छोट्या मुलांना सोबत घेऊन छोटेखानी रोपवाटिका तयार केली.त्यात शेवगा, आंबा आणि चिंचेच्या बियांचे रोपण प्लास्टिक पिशवी मध्ये रोपण करण्यात आले तसेच सिताफळ, पेरु आणि पिंपळाच्या रोपांचे प्लास्टिक पिशवी मध्ये रोपण करण्यात आले जेणेकरून ही रोपे आपल्याला पावसाळ्यात उपयोगी पडतील.प्रसंगी नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, नागपूर विभाग सहसचिव गुरुदास चौधरी, मुल तालुका संघटिका नंदा शेंडे, पुजा मोहुर्ले,कुणाल, नाविन्य आणि किट्टु उपस्थित होते.
नागपूर विभाग उपाध्यक्षा ललिता मुस्कावार यांनी लिंबाच्या रोपांचे प्लास्टिक पिशवी मध्ये रोपण करून तसेच उपस्थित महिलेला लिंबाचे रोप भेट देऊन जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला. नागपूर विभाग महिला सचिव कविता मोहुर्ले यांनी येणाऱ्या पावसाळ्यात उपयोगी व्हावे म्हणून चिकु आणि शेवग्याचे रोपं तयार केले. Plantation
मुल तालुका अध्यक्षा मिरा शेंडे यांनी चिंचेच्या बियांचे प्लास्टिक पिशवी मध्ये रोपण केले.
मुल तालुका संघटिका शशिकला गावतुरे यांनी शेजारच्या महिला, लहान मुलं आणि गावतुरे काकांच्या उपस्थितीत वडाचे आणि पपईच्या रोपांचे रोपण केले.
तसेच तालुका संघटिका सुनिता खोब्रागडे यांनी नेफडोला नुकतेच जुळलेले सभासद मंगला बोरकुटे आणि गिता दिवठे यांचे उपस्थितीत वृक्षारोपण करून जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला.
