News 34 chandrapur
चंद्रपूर - 2 एप्रिलला रात्री 8 वाजताच्या सुमारास नागरिकांना आकाशातून आगीचा गोळा खाली येताना दिसल्याने एकच खळबळ उडाली होती. (Meteor showers 2022)
यासंदर्भात अनेक अफवा उडाल्या, उल्कावर्षाव, धूमकेतू व रॉकेट पृथ्वीवर कोसळणार असल्याचा दावाही अनेकांनी केला होता. (Comets)
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या लाडबोरी गावात तो आगीचा गोळा कोसळला, ते आगीचा गोळा म्हणजे रॉकेटच्या अवशेषांची रिंग होती, त्यानंतर पुन्हा दोन ठिकाणी गोलाकार सिलेंडर तालुक्यात आढळले.
यानंतर अनेक अभ्यासक सिंदेवाही गावात पोहचले, चंद्रपुरातील स्काय वॉच ग्रुपचे सुरेश चोपणे यांनी ते अवशेष न्यूझीलंड देशातील सॅटेलाईट रॉकेट चे अवशेष असल्याचा दावा केला होता. Satellite rocket
मात्र सर्व अफवा आणि दाव्यावर पूर्णविराम मिळाला असून ते सर्व अवशेष चीनच्या रॉकेटचं डेब्रिस असल्याचे स्पष्ट झाले आहे. (China's Chang Zheng 3B rocket)
उत्तर महाराष्ट्रापासून ते विदर्भापर्यंतच्या आकाशात दिसलेले अग्निलोळ हे चीनच्या 'चँग झेंग ३ बी' या रॉकेटच्या तिसऱ्या टप्प्याचे अवशेष असल्याचे स्पष्ट झाले आहे. आकाशात दिसलेल्या घटनेनंतर चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांत जमिनीवर सापडलेले अवशेष रॅकेटचा तिसरा टप्पा आणि चिनी रॉकेटच्या क्रायोजिनिक इंजिनाचे भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
