News 34 chandrapur
प्रशांत गेडाम
सिंदेवाही - तालुक्यातील मरेगाव येथील जंगल परिसरात आज दुपारच्या सुमारास अंदाजे ३ ते ५ किलो चा काळ्या रंगाचा धातुचा गोळा मिळाला आहे. मिळालेल्या या गोळ्याला गावकऱ्यांच्या मदतीने पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे आणण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, काल दिनांक २ एप्रिल ला रात्री आकाशातून काहीतरी जळत्या स्वरुपात जमीनीवर पडत असल्याचे दृश्य सर्वांनी बगितले. काहींनी आपल्या मोबाईलमध्ये त्या दृश्याचे फोटो, विडियो काढले.
तर, काल रात्री अंदाजे ८ वाजेच्या च्या दरम्यान सिंदेवाही तालुक्यातील लाडबोरी गावात एक ८*८ ची मोठी रिंग ग्रामपंचायत च्या मागे पडली. रिंग बघण्याकरिता नागरिकांनी एकच गर्दी केली होती. नंतर मात्र या रिंग ला एका ट्रक्टर च्या मदतीने सिंदेवाही येथील पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आले. Meteor showers in chandrapur
लाडबोरी ची घटना ताजीच होती कि, दिनांक ३ एप्रिल ला सकाळी पवनपार-टेकरी जंगल परिसरात मोहफूल वेचण्याकरिता गेलेल्या काही नागरिकांना एक काळ्या रंगाचा गोळा पडलेला दिसुन आला. तर दूसरा गोळा मरेगाव येथील नैताम ह्या मोहफूल वेचण्याकरिता जंगल परिसरात गेल्या होत्या यांना, एक मोठा अंदाजे ३ ते ५ किलो चा असलेला काळ्या रंगाचा धातूचा गोळा दिसून आला.
(Fireball) नैताम यांनी ही माहीती सरपंच यांना दिली. सरपंच व गावकरी नैताम यांना घेऊन त्या ठिकाणी पोहचून त्या गोळ्या ला ग्रामपंचायत कार्यालयात आणले व याची माहीती तालुका प्रशासनाला दिली. मरेगाव येथे मिळालेला गोळा पोलीस स्टेशन ला पाठविण्यात आले असल्याची माहीती सरपंच मरेगाव व तलाठी नागापुरे यांनी दिली आहे. Comets

