चंद्रपूर - भद्रावती येथील तेलवासा रोडवरील शेतात 22 ते 25 वर्षीय युवतीचे नग्नावस्थेतील शीर नसलेला मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली असून सदर घटनेने पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे झाले आहे.
मृतक युवतीचा मृतदेह नग्नावस्थेत, शीर गायब हे कृत्य योजनाबद्ध पद्धतीने केल्या असल्याची शंका व्यक्त केली आहे. Murder
सदर घटनेबद्दल पोलिसही अवाक झाल्याने त्यांनी जिल्ह्यात सर्वत्र सदर युवतीचे वर्णनाबाबत नागरिकांनी माहिती द्यावी यासाठी मोहीम छेडली आहे.
Murder or rape?
महत्वाची सूचना
पोलीस स्टेशन चंद्रपूर शहर कार्यक्षेत्रातील सर्व गनमान्य नागरिक पोलीस मित्र यांना सदर शोध पत्रिका अनुषंगाने सूचित करण्यात येत आहे की भद्रावती येथे अज्ञात अनोळखी महिलेचे बिना डोक्याचे प्रेत दिं 04.04.2022 ला मिळाले असून सदर महिलेची ओळख पटविण्यासाठी सर्व स्तरावरून जिल्हा पोलीस विभाग प्रयत्न करीत आहे. Chandrapur police operation
सदर शोध पत्रिकेतील वर्णनाची स्त्री- आपले परिसरातून किंवा लगतचे वॉर्ड परिसरातून मीसिंग झाली असल्यास किंवा निघून गेल्याची माहिती असल्यास, यातील नमूद मृतक चे वर्णनाशी पडताळणी करून काही संशयास्पद वाटत असल्यास वेळीच पोलीस स्टेशन येथे माहिती पुरवावी.
सदर शोध पत्रिका ही आपले स्तरावर नजीकच्या परिसरात,गावात नागरिकांना पाठवून सदर शोध मोहिमेत सहकार्य करावे.
