Bjp ghughus
याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले की देवराव भोंगळे व त्यांची चमू गेल्या अनेक वर्षांपासून अनेक लोकोपयोगी कामे करीत आहेत. ज्यामध्ये आरोग्य शिबीरे, रक्तदान शिबीर, घरकुलांसाठी मदत, शहराचा पाणी पुरवठा नियमित करणे, रस्ते, नाल्या, लाईट, हायमास्ट यांचा समावेश आहे. असे कार्य त्यांच्या हातुन निरंतर सुरू राहो अशा शुभेच्छा आ. मुनगंटीवार यांनी याप्रसंगी दिल्या.
या कार्यक्रमाआधी आ. मुनगंटीवार यांनी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राला भेट दिली. गेल्या अनेक वर्षांपासून या सेवाकेंद्राच्या माध्यमातुन रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, उज्वला योजना, बचतगट, आयुष्यमान भारत, प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना, pancard, उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट, अटल विश्वकर्मा सन्मान कामगार योजना, विवाह नोंदणी, जातीचा दाखला, जीएसटी नोंदणी, विदेशात जाण्यासाठी पोलिस क्लीरीयन्स, डोमिसियल सर्टीफिकेट, अन्न परवाना कागदपत्रे sukanya samruddhi yojana समृध्दी योजना, महात्मा फुले जनआरोग्य योजना, उद्योग आधार साठी आवश्यक कागदपत्रे, ई-श्रमकार्ड, शेतमजूर दाखला, राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना या सर्व योजनांसाठी योग्य मार्गदर्शन केल्या जाते. या सेवाकेंद्राच्या माध्यमातुन केल्या जाणा-या कामांचे आ. मुनगंटीवार यांनी भरभरून कौतुक केले व असेच कार्य त्यांच्या हातुन होवो अशा शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला घुग्गुस शहरातील महिलांनी घुग्गुस शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच गुढीपाडव्यानिमीत्त भव्य मोटार सायकल रॅली काढली. या रॅलीत ३०० पेक्षा जास्त महिलांचा सहभाग होता. या रॅलीने घुग्गुस शहर दुमदुमले व शहरात चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. त्यानंतर देवराव भोंगळे यांच्या नविन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले की या कार्यालयाच्या माध्यमातुन मा. दिनदयालजी उपाध्याय यांच्या एकात्म मानववाद या आदर्शाला धरून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न व्हावा. समाजातील अविकसित, गरीब, शोषीत, पिडीत समाजाला जगण्यासाठी ज्या किमान गोष्टी लागतात त्या मिळवून देण्यासाठी या कार्यालयाच्या माध्यमातुन प्रयत्न व्हावे असेही आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैशाली ढवस, सुचिता लुटे, पुजा दुर्गम, नज्मा कुरैशी, सरिता इसारप, शारदा गोडसेलवार, सारिका भोंगळे, सिमा पारखी, सुनिता पाटील, पुष्पा रामटेके, कुसुम सातपुते, चंद्रकला मन्ने, साजन गोहणे यांनी अथक परिश्रम घेतले. याप्रसंगी सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवाकेंद्रातर्फे मोफत जलसेवेची सुध्दा सुरूवात करण्यात आली. कार्यक्रमाला ५ हजारच्या जवळपास महिला उपस्थित होत्या.
