News 34 chandrapur
चंद्रपूर - संभाजी ब्रिगेड आयोजीत शेणगाव ता.जि.चंद्रपूर येथिल ग्राम विकास महोत्सव निम्मित सत्यपाल महाराज यांच्या सत्यवाणी कार्यक्रमात प्रबोधन करतांना शेणगाव येथिल मागील सात वर्षापासुन संभाजी ब्रिगेडने केलेला विकास हा डोळे दिपविणारा आहे, ना खासदार ना आमदार, ना जि.प. किंवा पं.स सदस्य तरी ब्रिगेडच्या मावळ्यांनी गावाच्या सर्वांगीण विकासाठी १२ कोटीची कामे पुर्ण करुन ५ कोटीची कामे प्रस्तावित आहे, तेव्हा ग्रामपंचायतचा विकास येवढ्या मोठ्या प्रमाणात करु शकते तर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना जि.प., पं.स सदस्य, नगरसेवक, आमदार, खासदार केले तर ते प्रामाणीक पणे क्षेत्राचा विकास करु शकते अशी भुमिका मांडली. शेणगावची जनता संभाजी ब्रिगेडच्या विकासात्मक कामावर खुश आहे तर येणार्या काळात जि.प, पं.स, मध्ये सुध्दा तेवढ्याच प्रामाणीकपणे कार्य करुन आपला ठसा उमटवु शकते असा आशावाद सत्यपाल महाराजानी व्यक्त केला.
(Satyapal maharaj kirtan)
ग्राम विकास महोत्सवाचे उदघाटन सरपंच पुष्पाताई मालेकर यांनी केले तर अध्यक्षस्थानी विभागीय अध्यक्ष विनोददादा थेरे होते. कार्यक्रमाचे आकर्षन असलेले विशेष अतिथी-राष्ट्रीय प्रबोधनकार महाराष्ट्र भुषण सत्यपाल महाराज होते. Prabodhan kar satyapal maharaj
सदर कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष दिपक खारकर (विधानसभाध्यक्ष,चंद्रपूर) तर प्रमुख मार्गदर्शक इंजी.तुषारदादा उमाळे ,(प्रदेश संघटक सं.ब्रि.महाराष्ट्र) .)प्रा.दिलीप चौधरी सर (नेते संभाजी ब्रिगेड),चंद्रशेखर झाडे,(जिल्हाध्यक्ष सं.ब्रि. चंद्रपूर.) यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती-रवीभाऊ आसुटकर, (जेष्ठ मार्गदर्शक सं.ब्रि.चंद्रपूर.) इंजी.चेतन पावडे (विभागीय सचिव.) भाऊसाहेब बराटे (जिल्हा कृषी अधिक्षक चंद्रपूर), धिरज ताटेवार (H.R मॅनेजर धारीवाल कंपनी) अजय धोबे,(जिल्हाध्यक्ष यवतमाळ), अॅड.मंगेश घूंगरुड (जिल्हाध्यक्ष वर्धा), समीर खान (जिल्हा उपाध्यक्ष वर्धा), रमेश खवसे (उपसरंपच शेणगाव) ,राजेश कांबळे (जिल्हा उपाध्यक्ष चंद्रपूर तथा ग्रा.पं.सदस्य शेणगाव) ,प्रमोद मासिरकर (शाखाध्यक्ष तथा ग्रा.पं.सदस्य शेणगाव) यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये संपन्न झाला. मुख्य मार्गदर्शनानंतर प्रबोधनात्मक कीर्तनातुन शेणगाव व परीसरातील लोकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाला अंतुर्ला, महाकुर्ला, मोरवा, ताडाळी, नागाळा, कवठाळा, भारोसा, साखरवाही, पिंपरी, धानोरा, उसेगाव, वढा, सोनेगाव, पांढरकवडा, येरूर, चिंचाळा, नकोडा ,चंद्रपूर, राजुरा, वरोरा, वर्धा, घुग्घूस परीसरातील जनता हजारोच्या संख्येने उपस्थित होती.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन तेजस्वीनी बरडे यांनी केले तर प्रास्ताविक-चंद्रकांत वैद्य (प्रदेश उपाध्यक्ष संभाजी ब्रिगेड,महाराष्ट्र.) आणी आभार प्रदर्शन प्रशांत ठाकरे यांनी केले. Sambhaji brigade
ग्राम विकास महोत्सवाला यशस्वी करण्यासाठी दिपक खारकर, प्रमोद मासिरकर, अंकुश बोबडे, सुनील ठावरी, दिनेश मासिरकर, गणेश चटकी, ज्ञानेश्वर चौधरी, प्रशांत धांडे, मंगेश चटकी, प्रवीण ढाकणे, अमोल वैद्य, ओमेश मेसेकर, श्रीकांत ताजने, रोहित मिलमिले, राजकुमार बोबडे, राकेश भगत, मुकेश बोबडे आदी संभाजी ब्रिगेड शेणगाव शाखा, जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्ते, आणि समस्त शेणगाव व परिसरातील हितचिंतक यांच्या अथक परीश्रमाने यशस्वी करण्यात आला.