News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल - नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था चंद्रपूर जिल्ह्यातील मुल शाखेचा लोक कल्याणकारी अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प करुन तेजस्विनी व श्रीरंग नागोसे यांची मुलगी श्रद्धा चौहान मुलगा निशांत, हेमंत सुपनर व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस साहेब यांच्या सामूहिक वाढदिवसाचे औचित्य साधून ४ एप्रिल २०२२ रोजी मुल तालुक्यातील आदिवासी जंगल व्याप्त वाघाचे व वन्यप्राण्यांचे वावर असलेल्या फुलझरी गावात मोठ्या उत्साहाने उन्हाळ्यात समस्त नागरिकांना थंड पाण्याचे माठ (The fridge for the poor) व फणसाचे झाड वाटप करुन हा अभिनव व लोकोपयोगी उपक्रम साजरा करण्यात आला.
५६ माठ व ३२ झाडे जी.प.च्या सेवानिवृत्त teacher प्रेमीला शेंडे (तेजस्विनी नागोशे यांची आई) यांचे हस्ते देण्यात आले. या उपक्रमाची सुरुवात क्रांतीसुर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला मालार्पण करून करण्यात आले. निशांत आणि श्रद्धा यांचे वाढदिवसानिमित्त गरिबांचे फ्रिज मातीचे ५६ माठ आणि सन्मा.सुयोग धस सर यांच्या वाढदिवसानिमित्त ३२ फणसाच्या रोपे भेट देण्यात आली.
तसेच पर्यावरण संवर्धन मानवता विकास अंतर्गत उल्लेखनीय, उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल वार्षिक संमेलनाचे सन्मानचिन्ह जिल्हा अध्यक्ष सुषमा कुंटावार नागपूर विभाग उपाध्यक्ष श्रीरंग नागोसे, नागपूर विभाग सहसचिव गुरुदास चौधरी, यांना जेष्ठ पदाधिकाऱ्यांचा हस्ते सन्मानपूर्वक देण्यात आले.
या कार्यक्रमला तेजस्विनी नागोसे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा, नागपूर विभाग अध्यक्षा रत्ना चौधरी, नागपूर विभाग उपाध्यक्षा ललिता मुस्कावार, नागपूर विभाग उपाध्यक्ष नागोसे सर, नागपूर विभाग सचिव कविता मोहुर्ले, नागपूर विभाग सहसचिव गुरुदास चौधरी ,चंद्रपूर जिल्हा अध्यक्षा सुषमा कुंटावार, जिल्हा उपाध्यक्षा अल्का राजमलवार,मुल तालुका अध्यक्षा मिरा शेंडे, तालुका उपाध्यक्षा वंदना गुरनुले, तालुका संघटिका शशिकला गावतुरे, सुनिता खोब्रागडे, इंदू मांदाडे, निता कटकुरवार, वंदना वाकडे, देवगडे सर, पर्यावरण प्रेमी,प्रमीला शेंडे, देवगडे मॅडम,सूपनेर सर, प्रत्युष, ओम शेंडे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र वाढई, जानाळा गटग्रामपंचायत सदस्य रविंद्र मरापे, गावातील प्रतिष्ठीत नागरिक ढोले काकाजी तसेच फुलझरी येथील अनेक महिला,पुरुष गावकरी, शाळेचे विद्यार्थी, शेतकरी, यांची उपस्थिती लक्षणीय होती. या निमित्य .लहान मुला-मुलींना बिस्किटे वाटुन कार्यक्रमाची सांगता झाली. नैसर्गिक पर्यावरण मानवता विकास संस्थेने राबविलेल्या या लोकोपयोगी अभिनव उपक्रमाचे फुलझरी ग्रामस्थांकडून कौतुक केले जात आहे.
