चंद्रपूर - राजकारण एकीकडे व मैत्री एकीकडे असा इतिहास राज्यकर्त्यांचा आहे, मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार मात्र उघडपणाने मैत्री व शत्रूता दाखवीत असतात.
काही दिवसांपूर्वी शहरातील आझाद बगीचा उदघाटन कार्यक्रमात उडालेला गोंधळ सर्वानी बघितला आता चंद्रपुरातील पवित्र दिक्षाभूमीच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेला 50 लक्ष रुपयांचा निधी पुन्हा राजकारणातील दुरावलेल्या मैत्रीचे उदाहरण पुढे आले आहे.
माजी अर्थमंत्री व लोकलेखा समिती अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पवित्र दिक्षाभूमीच्या विकासासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करीत 50 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करून आणला, मात्र आता हाच दावा आमदार किशोर जोरगेवार यांनी केल्याने पवित्र दिक्षाभूमीचा विकास होणार असा शब्द कुणी पूर्ण केला? यावर प्रश्नार्थक चिन्ह उपस्थित झाले आहे.
चंद्रपूर येथील ऐतिहासिक पवित्र दीक्षाभूमी परिसरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनात वॉटर कुलर, ए.सी. Solar सिस्टीम तथा साऊंड सिस्टीमसाठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे. विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री यांनी बौध्द धर्मीय बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या दिनांक ३१ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये ५० लक्ष रू. निधी मंजूर करण्यात आला आहे.
आ. सुधीर मुनगंटीवार (sudhir mungantiwar) यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात पवित्र दीक्षाभूमी परिसरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटीच्या पदाधिका-यांनी आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. आ. मुनगंटीवार यांनी अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात २ कोटी रूपयांचा निधी मंजूर केला. या माध्यमातुन दीक्षाभूमी परिसरात आकर्षक भवनाचे बांधकाम करण्यात आले आहे. या भवनाच्या उद्घाटनप्रसंगी येथे वॉटर कुलर, ए.सी. सोलार सिस्टीम तथा साऊंड सिस्टीम बसविण्याची मागणी करण्यात आली. आ. मुनगंटीवार यांनी यासाठी ५० लक्ष रूपयांचा निधी उपलब्ध व्हावा यासाठी सामाजिक न्याय विभागाकडे सतत पत्रव्यवहार व पाठपुरावा केला. नुकत्याच संपन्न झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान दिनांक १४ मार्च २०२२ रोजी विधानसभेत तारांकित प्रश्न सुध्दा उपस्थित केला. अधिवेशन संपताच काही दिवसातच यासाठी आ. मुनगंटीवार यांनी प्रयत्नपूर्वक ५० लक्ष रू. निधी मंजूर करविला. Politics
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा १२५ व्या जयंतीनिमीत्त राज्यभर विविध कार्यक्रमांसाठी मोठया प्रमाणावर निधी उपलब्ध केला. ज्या पवित्र दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बौध्दधर्मीय बांधवांना दीक्षा दिली त्याच ठिकाणी २ कोटी रू. निधी खर्चुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनाचे बांधकाम करण्यापाठोपाठ त्याठिकाणी विविध सुविधासांठी ५० लक्ष रू. निधी मंजूर करवून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली आहे. तसेच बौध्दधर्मीय बांधवांना दिलेला शब्द पूर्ण केला आहे. Diksha bhoomi chandrapur
आमदार किशोर जोरगेवार (kishor jorgewar) यांच्या मागणीला यश आले असून दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले आहे. यातील ५० लक्ष रुपये दिक्षाभूमीच्या विकासासाठी तर दीड कोटी रुपये दलित वस्तींच्या सुधारणेसाठी मंजूर करण्यात आले आहे. Development fund
नागपूर नंतर चंद्रपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी धम्म दिक्षा दिली. त्यांच्या पवित्र पाऊलांनी चंद्रपूर येथील दिक्षाभुमी पवित्र झाली आहे. असे असले तरी या दिक्षाभुमीचा अपेक्षित असा विकास झालेला नाही. त्यामुळे नागपूर दिक्षाभुमीच्या धर्तीवर चंद्रपूर येथील दिक्षाभुमीचा विकास व्हावा याकरीता निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिवेशनात सातत्याने लावून धरली होती. त्यांच्या वतीने सदर मागणीचा सातत्याने पाठपूरावा केल्या जात होता. अखेर त्यांच्या पाठपूराव्याला यश आले असून दलित वस्ती सुधार निधी अंतर्गत दोन कोटी रुपयांचा निधी मंजुर करण्यात आले आहे यातील ५० लक्ष रुपयांचा निधी दिक्षाभुमीच्या विकासासाठी मंजुर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय राज्यशासनाच्या वतीने काढण्यात आला. या निधीतुन येथील विकासकामांना गती मिळणार आहे. तर दीड कोटी रुपये दलित वस्तींच्या विकासासाठी खर्च केल्या जाणार आहे. चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील दलित वस्तींच्या विकासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणही आमदार किशोर जोरगेवार यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा त्यांच्या वतीने संबंधित विभागाशी सातत्याने केल्या जात होता. अखेर त्यांच्या मागणीला यश आल्याने दलित वस्तींचा विकास होणार असुन येथील प्रलंबित कामांना गती मिळणार आहे.
दोन्ही आमदारांच्या दाव्याने नागरिक गोंधळले असतील मात्र सदर निधी कुणी पाठपुरावा करीत आणला असेल याची चांगली जाण चंद्रपूर शहरातील नागरिकांना आहे.
