चंद्रपूर - 3 एप्रिलला हत्या व 4 एप्रिलला भद्रावती येथील निर्जनस्थळी 22 वर्षीय युवतीचा निर्वस्त्र स्थितीत असलेला मृतदेह, आणि पोलिसांसमोर मृतदेहाची ओळख पटविण्याचे आव्हान, मात्र अहोरात्र तपास करीत चंद्रपूर पोलिसांनी 4 दिवसात तरुणीची ओळख पटवीत या प्रकरणात 2 आरोपीना अटक केली, त्यामधील मुख्य आरोपी अल्पवयीन युवती असल्याने तिची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली. Murder mystery
या संवेदनशील प्रकरणात पोलिसांनी गोपनीयता बाळगली मात्र काहींनी या प्रकरणी तरुणीच्या मृतदेहाचे नग्नावस्थेत असणारे फोटो समाजमाध्यमात व्हायरल केले, त्यानंतर फरार आरोपी शंकर कोरवन याला अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले, शंकर ला अटक केल्याच्या काही तासात त्याचाही फोटो व्हायरल झाला इतकेच नव्हे तर त्याचा पोलीस स्टेशनमध्ये घेतलेला तो फोटो होता. Viral crime
अजब म्हणजे पोलिसांनी आजही मृत तरुणीचे नाव जाहीर केले नाही, मात्र वृत्तवाहिनीने त्या मृत तरुणीचे नाव व तिचा मूळ फोटोसहित बातमी प्रकाशित केली होती, बातमी अंगावर आली असताना डिलीट करण्यात आली पण असा मूर्खपणा का? करण्यात आला, ती मृत मुलगी फोटो मध्ये असणारीचं आहे याला बळ कुणी दिले, त्या मृतक तरुणीच्या शिराचा फोटो ही व्हायरल झाला, सर्वात आधी हा फोटो एका अतिउत्साही असणाऱ्या व्यक्तीने फेसबुकवर टाकला.
Chandrapur police
हद्द तर तेव्हा झाली ज्यावेळी अल्पवयीन आरोपीचा फोटो व्हायरल झाला, विशेष म्हणजे दुसरा आरोपी युवक व मुख्य सूत्रधार अल्पवयीन मुलीचे फोटो हे पोलीस स्टेशनमधील आहे.
चंद्रपूर पोलिसांचे गुन्हा उघड करण्यात नेहमी अग्रेसर असणारी स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल ने "झारी मधील शुक्राचार्य कोण" याचा शोध जरूर घ्यावा म्हणजेच भविष्यात घडणारे संवेदनशील प्रकरणी अशी चूक होता कामा नये.
सध्या जगात सर्वात जलद मध्यम म्हणजे फेसबुक व व्हाट्सअप्प याचा चांगला उपयोग सर्वात जास्त आहे मात्र काही वेडसर असणारे नागरिकचं या माध्यमाचा वाईट वापर करीत आहे.
पोलिसांनी असले गंभीर प्रकार टाळायला हवे, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्पवयीन मुलांचे फोटो व्हायरल केले तर त्याला कठोर शिक्षेचे प्रावधान आहे, पण पोलीस यावर कारवाई करायला का तयार होत नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
