News 34 chandrapur
चंद्रपूर : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा देशातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या घरावरील षडयंत्रकारी भ्याड हल्ल्या विरोधात स्थानिक जनता कॉलेज चौकात निषेध निदर्शने करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते तथा ओबिसी नेते डॉ. अशोक जीवतोडे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्ते व पदाधिकारी सहभागी झाले होते.
एसटी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीसाठी आक्रमक झाले आहेत. शेकडोच्या संख्येने कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक निवासस्थानात घुसून आंदोलन करत शरद पवारांच्या घरावर चप्पल आणि दगडफेक करण्यात आली.
उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले होते. तसेच, कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन आणि ग्रॅच्युएटी देण्यासह त्यांच्यावर कारवाई न करण्याची सूचना एसटी महामंडळाला केली होती. पण, तरीही पुन्हा एसटी कर्मचारी आक्रमक झाले. शेकडोच्या संख्येने एसटी कर्मचारी शरद पवारांच्या मुंबईतील निवासस्थानात घुसले आणि घोषणाबाजी केली. हा न्यायालयाचा अवमान असून ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधातील षडयंत्र आहे. देशातील ज्येष्ठ व जनसेवेसाठी झटत आलेल्या नेत्याच्या घरावर असा भ्याड हल्ला करणे पुरोगामी व सामाजिक सुधारकांचा वारसा जपणाऱ्या राज्यातील अशोभनीय घटना असून अशा घटनांचा व षडयंत्रकारी प्रवृत्ती चा तीव्र निषेध करण्यात येत असल्याचे डॉ. अशोक जीवतोडे यांनी म्हटले.
यावेळी संजय सपाटे, अशोक पोफळे, नितीन कुकडे, रवि देवाळकर, आरीफ शेख, संजय बर्डे, आशिष महातले, विनायक बोडाले, जोत्सना लालसरे, असलम सुरीया, मंजुळा डूडुरे, प्रशांत चहारे, विजय मालेकर, महेश यार्दी, प्रकाश बेंडले, किशोर ठाकरे, नितीन खरवडे, सचिन सुरवाडे, निर्दोष दहिवले, आदी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी कांग्रेसचे सदावर्ते विरोधात आंदोलन
दिनांक 8/4/22 ला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पवार साहेब ह्यांच्या मुंबई येथील silver oak निवस्थानावर काही वाईट प्रवृत्तीच्या सांगण्यावरून भ्याड हल्ला करण्यात आला.
त्या झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज दिनांक 9/4/22 ला चंद्रपूर शहर आणि चंद्रपूर ग्रामीण राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने चंद्रपूर येथील जटपुरा गेट जवळील महात्मा गांधी पुतळ्या जवळ शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड आणि ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य ह्यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले
आंदोलन करते वेळी सदावर्ते ह्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. Sharad pawar attack
तसेच पवार साहेब ह्यांच्या घरावर जो भ्याड हल्ला करण्यात आला ह्याच्या मागे मुख्य सुत्रदार कोण ह्याचा तपास घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी असे निवेदन पोलीस अधीक्षक साहेब चंद्रपूर ह्यांना निवेदन देण्यात आले. Advocate gunwant sadawarte
आंदोलन करते वेळी जेष्ठ नेते बोरकुटे साहेब, विधानसभा अध्यक्ष सुनील काळे,महिला जिल्हाध्यक्ष बेबी ताई उईके, ओ बी सी जिल्हाध्यक्ष आरिकर साहेब, जेष्ठ नेते दीपक जयस्वाल, महिला शहर अध्यक्ष शालिनी महकुलकर, पिदूरकर साहेब शशिकांत देशकर, सतीश मिणगुलवार,प्रियदर्शन इंगळे,विपील झाडे, प्रवीण जुमडे,अभिनव देशपांडे,नौशाद सिद्दिकी, पुजाताई शेरकी,शिल्पा कांबळे,प्रज्ञा पाटील, संभाजी खेवले,निसार शेख,कुमार पॉल,विनोद लभाने, वाळके साहेब,रेखा जाधव,वंदना आवळे, नगरसेविका मंगला आखरे, धनंजय दानव,ज्योती रंगारी, राजू आखरे, अमित गावंडे,राहुल देवतळे, देवा धामंगे निमेश मानकर, किसन झाडे, प्रदीप रत्नपारखी, केतन जोरगेवार, सतीश मांडवकर,मनोज सोंनी,केतन जोरगेवार, राहुल वाघ कुणाल धेंगरे,पंकज मेंढे,मुन्ना तेमबुरकर,हर्षल भुरे,स्नेहल नगराळे,तुषार बिस्वास, अक्षय सुखदेव,विपील लभाने,किरण कच्चवर,मिथुन हलदार, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

