News 34 chandrapur
राजुरा - 19 एप्रिलला रात्रौ 11 वाजताच्या सुमारास राजुरा शहरातील स्नेहदीप गारमेंट्स या कपड्याच्या दुकानाला भीषण आग लागली.
रात्री स्नेहदीप गारमेंट्स चे संचालक राकेश नामेवार दुकान बंद करून घरी गेले होते, मात्र रात्रौ 11 वाजता दुकानाला अचानक आग लागली, आगीचा धूर परिसरात पसरत असताना नागरिकांनी आगीवर नियंत्रण करण्याचा प्रयत्न केला पण आगीने विक्राळ रूप धारण केले होते. Huge fire
नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला याबाबत माहिती दिली, राजुरा नगरपरिषद व बल्लारपुरातील अग्निशामक विभाग तात्काळ घटनास्थळी दाखल होत आगीला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला.
अखेर दीड तासांनी अग्निशामक विभागाने आगीवर नियंत्रण मिळविले. Garments shop fire
सदर आगीत दुकानातील कापड, ड्रेस मटेरियल, काऊंटर, कंप्युटर, सीसीटीव्ही संच, कपाटे यासह अनेक वस्तु आगीच्या भक्षस्थानी गेल्या. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
Fire brigade
आग विद्युत शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजुरा पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून अधिक तपास सुरू आहे.
