News 34 chandrapur
ब्रह्मपुरी - ब्रह्मपुरी आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील पाचगाव (रुई) जवळील प्रथमेश बार जवळ अज्ञात वाहनाने मोटारसायकलला धडक दिल्याने 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. Accident
19 एप्रिलला सायंकाळी 7 वाजता 28 वर्षीय प्रमोद चौधरी हा युवक आरमोरी वरून खाजगी काम आटोपून दुचाकीने गावी जात होता मात्र राष्ट्रीय महामार्गावरील पाचगाव जवळ पोहचताच अज्ञात वाहनाने प्रमोद च्या दुचाकीला जोरदार धडक दिली. Unidentified vehical
गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी तात्काळ प्रमोदला उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे नेत होते मात्र वाटेतच त्याचा मृत्यू झाला.
पोलिसांनी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला. पोलीस अज्ञात वाहनाचा शोध घेत आहेत.
