News 34 chandrapur
गडचांदूर - आरोग्य नेहमी सुदृढ राहावे यासाठी अनेक नागरिक शुद्ध हवे साठी सकाळी मॉर्निंग वॉक ला जातात मात्र वाहनांच्या वर्दळीत ही मॉर्निंग वॉक जीवघेणी सुद्धा ठरते.
नेहमी प्रमाणे सकाळी गांधी स्कॉलर अकॅडमी चे मुख्याध्यापक मालेकर व मेडिकल व्यावसायिक ढवस हे सोबत मॉर्निंग वॉक ला गेले होते. Morning walk
मात्र आजची सकाळ त्यांच्या आयुष्यातील शेवटची सकाळ असेल असे त्यांना माहीत नव्हते, खिर्डी ते धामणगाव मार्गावर भरधाव वेगात असणाऱ्या अज्ञात ट्रक ने दोघांनाही चिरडले. Terrible accident
या धडकेत दोघांचाही मृत्यू झाला, अपघातानंतर खिर्डी-धामणगाव मार्गावर तणावाची स्थिती निर्माण होत वाहतूक ठप्प झाली होती.
