News 34 chandrapur
चंद्रपूर - दुर्गापुरात आज एका सराईत गुन्हेगाराला स्थानिक गुन्हे शाखेने माऊजर सहित अटक केली, खून करण्याच्या तयारीत असणाऱ्या त्या गुन्हेगाराला गुन्हा घडण्याआधी स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. Lcb chandrapur दुर्गापुरात एक इसम देशी बनावटीचा माऊजर स्वतः जवळ बाळगून फिरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी तात्काळ त्या इसमाला अटक करण्याचे निर्देश देत एक पथक पाठविले.
एका दुकानासमोरून तो इसम जात असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला थांबवित विचारपूस केली. Live cartridges
त्याने स्वतःचे नाव 36 वर्षीय प्रमोद रामलाल सुर्यवंशी सांगत तो उर्जानगर नेरी येथे राहत असल्याची माहिती दिली. Desi Katta
प्रमोद ची अंगझडती घेतली असता त्याचेंजवळून देशी बनावटीची माऊजर व 5 जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेने कसून त्याची चौकशी केली व तो माऊजर का बाळगत आहे याबद्दल विचारणा केली त्यावेळी त्याने सांगितले की काही दिवसांपूर्वी दुर्गापुरात खुनाचा प्रयत्न करणारा गुन्हा घडला होता, त्या प्रकरणातील आरोपीने सुर्यवंशीला जीवे मारण्याची धमकी दिली होती. Mauser
याकरिता त्या आरोपीला आपण आधीच ठार करू यासाठी सूर्यवंशी ने स्वतःजवळ माऊजर बाळगली होती.
एक हत्येचा गुन्हा घडण्याआधी स्थानिक गुन्हे शाखेने त्या गुन्ह्याला टाळले. प्रमोद सूर्यवंशी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे.
Chandrapur police
सदरची यशस्वी कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि जितेंद्र बोबडे, सपोनि संदीप कापडे, पोउपनी अतुल कावडे, अतुल बलकी, अनुप डांगे, जमीर पठाण, नितेश महात्मे, मिलिंद चव्हाण, मयूर येरणे व प्रमोद कोटनाके यांनी पार पाडली.
