News 34 chandrapur (गुरू गुरनुले)
मुल- मुल येथील शिवसेना पदाधिकारी,कार्यकर्ता सवाद बैठकीचे आयोजन धनश्री सभागृह मुल येथे करण्यात आले होते.
या बैठकीला शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे, मुकेश जिवतोडे, शहर प्रमुख चंद्रपूर प्रमोद पाटिल,बल्लारपुर विधानसभा उपजिल्हाप्रमुख सिक्की यादव,पोंभुर्णा न.पं.गटनेता तथा तालुका प्रमुख आशिष कावटवार, नगरसेवक गणेश वासलवार व आदी मान्यवर उपस्थीत होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांचा वाढदिवसानिमीत्त केक कापुन शालश्रीफळ देऊन अनेक शिवसेना सदस्य यांनी शुभेच्छा दिल्या.यावेळी कार्यक्रमात संपर्क प्रमुख कदम साहेब,शिवसेना जिल्हाप्रमुख संदिपभाऊ गिर्हे,पोंभुर्णा तालुका प्रमुख आशिष कावटवार व नगरसेवक गणेश वासलवार यांनी पक्ष संघटनेबाबत, पक्षाचा विस्तार व संघटन मजबूतीबाबत,मुख्यमंत्री उध्दव साहेब ठाकरे यांच्या महत्वकांशी योजना पोहचवा व मुल तालुका हा शिवसेनेचा बाल्लेकीला बनवा येणार्या निवडणूकी साठी कामा लागा अस महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. Shivsena chandrapur
कार्यक्रमाचे संचालन ओमदेव मोहुले यांनी केले. प्रस्ताविक शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख तथा सदस्य ग्राम पंचायत चीचाळा यांनी आपल्या प्रास्ताविकात मागील काळातील आपल्या कार्यावर प्रकाश टाकला आणि येणाऱ्या नगर परिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या होणाऱ्या निवडणुकी जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला. यानिमित्य प्रशांत गट्टूवार यांचे नेतृत्वात चिखली या गावातील उमेश पाल व इतर कार्यकर्ते सहित जिल्हा प्रमुख संदीप गिरे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला. उपस्थित शिवसैनिक पदाधिकारी यांचे आभार शंकर पाटेवार यांनी मानले. Election meeting
याप्रसंगी महेश चौधरी,रवी शेरखी,राहुल महाजनवार, अरविंद करपे,अमुतीवार,माजी तालुका प्रमुख काळे, पुरुषोत्तम बोरकुटे व महिला तालुका संघटिका रजनी ताई झाडे, माजी तालुका संघाटीका सोनिया ताई डोरलिकर अंजू ताई कुंनघडकर विनोद चलाख,रुपेश जांबुलावार,मंगेश मोहुर्ले,शुभम पुप्रेडिवार, राजू नागापुरे, तीपुल चावरे,आदी शेकडोच्या संख्येने आजी माजी पदाधिकारी महिला आघाडी उपस्थीत होते.
