News 34 chandrapur
चंद्रपूर - नविन चंद्रपूर येथील म्हाडाच्या गटार योजनेच्या 53 कोटी 29 लाख 22 हजार रूपयांच्या कामाचा बांधकामाचा दर्जा निकॄष्ट असल्याने इमारतींना भेगा पडल्या तर पाइपलाइनच्या चेंबरला तडे गेल्याचे आढळून आले. या बाबत संजीवनी पर्यावरण संस्थेच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार म्हाडाच्या कार्यकारी अभियंत्यांनी आपल्या टिम सह गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी केली. यावेळी म्हाडाचे कार्यकारी अभियंत्या उषा टेंभुर्णे, उप अभियंता दिलीप लामपूसे, ईगल इन्फा इंडिया लि. चे गोपाल झोडे उपस्थित होते. Drainage scheme construction
गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी करण्यात येत असताना तक्रारकर्त्यांनी घेतलेल्या आक्षेपाची शहानिशा करण्यात आली. तक्रारकर्ते संजीवनी पर्यावरण व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी गटार योजनेच्या बांधकामाला गेलेले तडे तसेच बांधकामात उपयोग करण्यात येत असलेल्या निकॄष्ट दर्जाच्या साहित्य अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले. MHADA
गटार योजनेच्या बांधकामाची तपासणी करताना म्हाडाचे अधिकारी कंत्राटदाराची पाठराखण करत असल्याचा आरोप संजीवनी पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केला. बांधकामातील त्रूटी दाखविल्या नंतर ही म्हाडाचे अधिकारी कंत्राटदाराची बाजू घेत होत्या. गटार योजनेच्या कामाचा दर्जा प्रत्यक्ष पाहताना खराब असताना देखील अधिकारी त्याची नोंद घेण्यास तयार नव्हते. यावरून असे निदर्शनास येत आहे की म्हाडाच्या अधिकाऱ्यांचे कंत्राटदार सोबत साठगाठ आहे. म्हाडाच्या गटार योजनेच्या बांधकामाच्या भ्रष्टाचारात अधिकारी व कंत्राटदार सहभागी आहे. असा आरोप संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केला आहे
