News 34 chandrapur
युवासेने तर्फे संविधान चौकात बाबासाहेबांना मानवंदना
चंद्रपूर :- भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शतकोत्तर जयंती युवासेने तर्फे शहरातील इंदिरा नगरातील संविधान चौकात युवासेनेचे जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे यांच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली. विक्रांत सहारे यांनी डॉ बाबासाहेबांच्या फोटोला माल्यार्पण करत अभिवादन केले. परिसरातील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत संविधान चौकात बुद्ध वंदना करण्यात आली.
यावेळी जिल्हा समनव्यक विक्रांत सहारे सह रीकी टेंभुरकर, एकनाथ चौरे, प्रफुल उईके, सुशील उईके, आशिष चंदनखेडे, सुनील खोब्रागडे, लखन लांडगे, अनुराग गजघाटे, मोठ्या संख्येने युवासेनेच्या कार्यकर्त्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
-------------------------------------
बोधिसत्व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आम आदमी पार्टी बाबुपेठ तर्फे भव्य बाईक रॅली
चंद्रपूर - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्त बाबुपेठ मधून आप चे शहर सचिव राजू भाऊ कुडे यांच्या नेतृत्वात भव्य बाईक रॅली काढण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर अर्धकृती पुतळ्या पासून सिध्दार्थ नगर, लुंबिणि नगर, अंबेडकर नगर, सम्राट चौक, बुद्ध नगर, पंचशील चौक, ते गांधी चौक बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या पर्यंत भव्य बाईक रॅली काढत बाबासाहेब यांचा जयघोष करण्यात आला. तसेच प्रत्येक चौकात बाबासाहेब यांना वंदना करण्यात आली.
यावेळेस आप चे शहर सचिव यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकत आपले मनोगत व्यक्त केले सर्वधर्म समभाव, बंधुत्वता देशात कायम करायची असेल तर बाबासाहेब यांचे विचार जनमानसात रुजवणे गरजेचे आहे. याप्रसंगी उपस्थितमध्ये जिल्हा अध्यक्ष सुनिलभाऊ मुसळे, शहर सचिव राजू भाऊ कुडे, महिला जिल्हा उपाध्यक्ष जस्मिन शेख, महिला शहर संघटन मंत्री सुजाता ताई बोदेले, महिला शहर सचिव आरती ताई आगलावे, बाबुपेठ प्रभाग अध्यक्ष अनुप तेलतुंबडे, जयंत थूल, निखिल बारसागडे, जयदेव देवगडे, विरू भाऊ खोब्रागडे, कालिदास ओरके, तृषांत भाले, सुखदेव दरुंडे, सागर बोबडे, वैभव खंडाळे, निळकंठ खंडाळे, सुशांत धकाते, कार्तिक बल्लावार, कोमल कांबळे, सुनिल पचारे, रवींद्र रामटेके, प्रविण चूनारकर, इत्यादी उपस्थित होते.
-----–----––-----------------
"या जगाला युद्ध नको,बुद्ध हवा" महामानवाची जयंती उत्साहात साजरी
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वातंत्र्य,समता,न्याय,बंधुत्व आणि एकतेचा विचार दिला त्या विचाराची आज खऱ्या अर्थाने जगाला जास्त गरज आहे.आज संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहाने या महामानवाची 131 वी जयंती एक सामाजिक समता दिन म्हणून साजरी होत आहे."या जगाला युद्ध नको,बुद्ध हवा" असा संदेश देणारे विश्वासरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती इतर ठिकाणांसह 14 एप्रिल रोजी गडचांदूर शहरात मोठ्या उत्साहात व शांततामय वातावरणात साजरी करण्यात आली.जयंतीचे औचित्य साधून शहरात विविध कार्यक्रम पार पडले.सकाळी बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ उपस्थिताना बुद्ध वंदना देण्यात आली. यानंतर आयोजित विशाल मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली. शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत पुतळ्याजवळ सदर रॅलीचा समारोप झाला.शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला सायंकाळी शहरातील राजकीय,सामाजिक व्यक्ती, स्थानिक ठाणेदार व भीम अनुयायांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर एक भव्य अशी रॅली काढण्यात आली. यामध्ये असंख्य भीम अनुयायांनी मोठया हर्षोल्हासाने सहभाग नोंदवला.रॅली मध्ये उभारण्यात आलेली विविध मनमोहक झांकी व आकर्षक रोषणाई प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करीत होते.
ढोलताशे व डिजेच्या तालावर नृत्य करीत असलेल्या तरूणाईचा उत्साह यावेळी वाखानन्याजोगा होता.न भूतो न भविष्यतो अशी ही ऐतिहासिक रॅलीचे दृश्य पाहण्यासाठी एकवटलेल्या गर्दीला जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.या दरम्यान जय भीमच्या घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला.शहरातील मुख्य मार्गाने भ्रमण करीत सदर रॅलीची समाप्ती डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ झाली.मागील दोन वर्ष कोरोनामुळे सर्व सण, उत्सवांवर बंधन घालण्यात आले होते.मात्र यंदा बंधनमुक्त व मोकळ्या वातावरणात विविध सण,उत्सव अतिशय शांत पद्धतीने साजरे होत असल्याचे चित्र आहे.उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.


