News 34 chandrapur
चंद्रपूर - मोठा भावाचा पुण्य स्मरणाचा कार्यक्रम आटोपून घरी जात असताना चीचपल्ली जवळ लहान भावाच्या गाडीचा भीषण अपघात झाल्याने त्या अपघातात सासू-सुनेचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले.
14 एप्रिल रोजी चंद्रपुरात मोठ्या भावाच्या पुण्य स्मरणाचा कार्यक्रमासाठी पोलीस कर्मचारी अनिल पारखी आपल्या कुटुंबियांसह चंद्रपूर ला आपल्या घरी आले होते. A terrible accident
दिवसभर कार्यक्रम आटोपून 15 एप्रिलला सकाळी कर्तव्यावर रुजू व्हायचे असल्याने अनिल पारखी रात्री 10 वाजता कुटुंबियांसोबत चामोर्शी ला जायला निघाले. Police accident
चीचपल्ली जवळ पोहचल्यावर वाटेत अचानक जनावर आडवे आल्याने चारचाकी वाहन क्रमांक Mh 33 V 9688 चे नियंत्रण सुटले, चारचाकी वाहन 4 वेळा पलटी होत, नवीन बनलेल्या पुलाच्या खाली कोसळले.
अपघात इतका भयंकर होता की यामध्ये अनिल पारखी यांची पत्नी 32 वर्षीय किरण पारखी, आई 65 वर्षीय शोभा पारखी यांचा जागीच मृत्यू झाला. The animal came in front of the car
पोलीस कर्मचारी अनिल पारखी 40, साधना पारखी 45, राम पारखी 7, आराध्या पारखी 4, ओम 10 व नंदिनी 14 वर्ष हे जखमी झाले आहे.विशेष बाब म्हणजे अपघात झाल्यानंतर पारखी कुटुंबियांचे सर्व सामान गाडी खाली पडले, काहींनी तर पारखी यांच्या पर्स मध्ये असलेले सोन्याचे दागिने चोरून नेल्याचे कळते.जखमींचा उपचार चंद्रपुरातील खाजगी रुग्णालयात सुरू आहे.
