News34 chandrapur
चंद्रपूर - महानगरातील इंडस्ट्रियल एरिया भागातील घटना सततचा कौटुंबिक वाद व पतीच्या दारूच्या व्यसनाला त्रस्त पत्नीने पतीची निर्घुण हत्या केल्याची घटना गुरुवारी 14 एप्रिलला घडली असुन दुसऱ्या दिवशी 15 एप्रिलला सकाळच्या सुमारास उघडकीस आली. सदर घटना चंद्रपूर मुल मार्गावरील इंडस्ट्रियल एरिया परिसरात घडली.
महानगरातील बंगाली कॅम्प लगतच्या इंडस्ट्रियल एरिया परिसर जलसंपदा विभाग अंतर्गत विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर कार्यालय, उपविभागीय अभियंता लघु पाटबंधारे विभागाचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या लगतच मृतक अलकराम मनीराम राऊत आपल्या पत्नीसह भाड्याच्या घरात वास्तव्य करीत होते. ते मूळचे छतीसगड राज्यातील रहिवासी असून, चंद्रपुरात रोजगाराच्या शोधात आले होते. मृतक हा मिस्त्रीचे काम करीत होता. Brutal murder

पती-पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद व्हायचे. शिवाय मृतकला दारूचे व्यसन होतें. (Alcoholism) त्याच्या व्यसनात वाढ झाली. याच कारणावरून त्यांच्यात दररोज भांडण व्हायचे. या वादातूनच आरोपी पत्नी सुरजाबाई राऊत हिने पतीला गुरुवारी रात्री जबर धक्काबुक्की केली. त्यामुळे तो खाली पडला. दारूच्या नशेत असल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला. त्यानंतच्या आरोपी पत्नीने बेलण्याने मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. (Family disputes)
आरोपी पत्नीला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.
(बातमी स्वतः लिहली की आपण त्यामध्ये काही वेगळेपण आणू शकतो, मात्र स्वयंघोषित पत्रकार म्हणून आपण कॉपी करीत आहात, बातमी कॉपी करण्याचं कृत्य करून तुम्ही स्वतःची अक्कलशुन्य बुद्धिमत्ता दाखवीत आहे. बातमी कॉपी पेस्ट सहज करू शकतो, मात्र अश्या प्रकाराने तुम्ही स्वतः लिहता न येणारे पत्रकार म्हणून स्वतःला घोषित करीत आहात.)