News 34 chandrapur
वरोरा/शेगाव - महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष 30 वर्षीय महेश बबनराव घोडमारे यांचा दगड व रॉडने वार करीत निर्घृण पणे खून केला.
याप्रकरणी शेगाव पोलिसांनी शेगाव व खडसंगी येथून 2 आरोपींना अटक केली आहे.
समाजसेवेत नेहमी अग्रेसर असणारे महेश घोडमारे यांनी शेगाव मधील नागरिकांना सेतू मार्फत उत्पन्न दाखले, जातीचे प्रमाणपत्र काढून देण्याचे काम करीत होते. Murder
विविध कामात महेश हे काम करीत नागरिकांची सेवा करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते.
मागील 3 दिवसापासून महेश हा आपल्या कामाकरिता गावाबाहेर गेला होता, तो परत न आल्याने महेश च्या कुटुंबियाने हरवल्याची तक्रार नोंदवली. Chairman of the Dispute Resolution Committee
शेगाव पोलिसांनी तपास सुरू केला असता महेश हा मेसा येथून दुसऱ्याच्या दुचाकीवर बसून वरोरा येथे गेल्याची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना मिळाली.
नंतर ती दुचाकी मेसा समोरील जंगल परिसरात दिसली असल्याने पोलिसांनी त्या परिसरात शोध मोहीम राबविली असता त्या ठिकाणी चप्पल, रक्त, लोखंडी रॉड व झुडपाच्या मध्ये महेश चा रक्तबंबाळ अवस्थेत असलेला मृतदेह आढळला.
शेगाव चे ठाणेदार अविनाश मेश्राम यांनी घटनास्थळ गाठत याबाबत तपास केला असता महेश ची हत्या दगड व रॉडच्या वाराने झाला असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला.
शेगाव पोलिसांनी सदर हत्येप्रकरणात तपास केला असता खडसंगी व शेगाव मधून दोघांना अटक केली.
दोघांनी हत्येची कबुली दिली असून हत्येमागचं कारण काय हे अजूनही अस्पष्ट आहे.
पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहे.
