News 34 chandrapur
चंद्रपूर - लोकमत सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चंद्रपुरातील विविध क्षेत्रातील महिलांचा उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकमतचे एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. Lokmat paperयामध्ये आमदार प्रतिभा धानोरकर, डॉ. अभिलाषा गावतुरे, ऍड. वैशाली टोंगे, भारती रामटेके, वंदना जांभुळकर, वर्षा लांजेवार, मंजुषा बजाज, स्मृती लोणारे, स्नेहा भाटिया यांचा समावेश होता.
मात्र या सत्कारमूर्ती महिलांमध्ये आकर्षणाच्या केंद्रस्थानी गंगुबाई उर्फ अम्मा जोरगेवार होत्या. Success story
कुटुंबाची जबाबदारी पार पाडत अम्माने गांधी चौकात टोपल्या विकण्याचे काम सुरू केले, स्वतः टोपल्या बनवीत त्या विक्रीतून जे पैसे मिळायचे त्यामधून अम्माने संसाराचा गाडा ओढला. Vijay darda
मुलांना मोठे करीत त्यांना दुसऱ्या कामात लक्ष द्यायला सांगितले, अम्माने आपल्या मुलांना माणुसकीची शिकवण दिली व एक दिवस ती टोपले विकणाऱ्या अम्माचा मुलगा चंद्रपूर शहराचा आमदार बनला.
मात्र श्रीमंती आली तर माजू नये व गरिबी आली तर लाजू नये अशी अम्माची शिकवण, मुलगा चंद्रपूर विधानसभेचा आमदार बनल्यावर ही अम्मा आजही गांधी चौकात टोपल्या विकतात. Lokmat group
त्यांच्या या साधेपणाला लोकमत समूहाने पुरस्कार देत गौरविले, लोकमत वृत्तपत्राचे चेअरमन विजय दर्डा यांनी ही अम्माच्या संघर्षाला सलाम करीत, मला ही काही टोपल्या हव्या अशी मागणी केली.
काही दिवसांपूर्वी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही अम्माला भेटण्याचा मोह आवरता आला नाही, आर्थिक स्थिती वाईट असल्यावर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर संघर्ष करणाऱ्या अम्माची भेट घेतल्यावर नामदार थोरात यांनीही त्यांचं कौतुक केले.
आज ही आमदार किशोर जोरगेवार अम्माचं नाव प्रत्येक भाषणात करीत असतात, आज मी जे काही आहो ते अम्मा मुळेच आहो, असे उद्गार ते आपल्या अम्मा साठी नेहमी काढतात.

