News34 mul
प्रतिनिधी/गुरू गुरनुले
मुल - मुल येथील बसस्टँड समोर अनेक वर्षांपासून श्रीराम भक्त हनुमानाचे जागृत देवस्थान आहे. या हनुमान मंदिरात जाऊन जो भाविक मनोभावे श्रद्धा ठेवून भक्तिभावाने पूजा करीत असेल त्याला त्याचा फळ नक्कीच मिळाला असल्याची ख्याती असल्याचे भक्त जणांनी अनुभवले आहे.Mahashivratri अशा जागृत असलेल्या हनुमान मंदिरासमोर दरवर्षीच महाशिवरात्री उत्सव निमित्य मार्कंडा देवस्थान येथे विदर्भातूनच नव्हे महाराष्ट्रातूंच असंख्य भाविक मुल येथूनच यात्रेला जात असतात करिता बसस्टँड वर असलेल्या हनुमान देवस्थानचे जिर्णोद्वार आणि चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोषसिंह रावत व संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष राकेश रत्नावार यांच्या सहकार्याने महाशिवरात्री उत्सव निमित्य यात्रेला जाणाऱ्या येणाऱ्या भाविकांसाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील महाप्रसादाचे वाटप संतोषसिंह रावत यांनी स्वतःच्या हाताने केले आहे. या महाप्रसादाचा लाभ असंख भाविकांनी घेतला असून महाप्रसादाचे वाटप करतांना राकेश रत्नावार परिवार, युवक कार्यकर्ते संदीप मोहबे, विवेक मुत्यलवार, गणेश रणदिवे, राकेश पुनावार, सुमंतवार, आटो चालक श्री.गेडाम इत्यादीनी महाप्रसादाचे वाटप करण्यासाठी सहकार्य केले.