News34
चंद्रपूर - : ख्रिश्चन समाजाचा विकास करण्यासाठी, कुठलाही भेदभाव न करता, त्यांना सक्षम करण्यासाठी तसेच ख्रिश्चन समाजाच्या समृद्धीसाठी कटिबद्ध असून उच्च शिक्षण, आर्थिक विकास, राजकारणात सहभाग, सामाजिक सुरक्षा प्रदान, महिला स्वयंरोजगार, जिल्हास्तरीय वसतिगृह, तालुका स्तरावर कब्रस्थान हे प्रश्न मार्गी लावेल अशी ग्वाही खासदार बाळू धानोरकर यांनी दिली. ते बल्लारपूर येथे ख्रिस्ती विकास समितीने आयोजित केलेल्या Pastors सत्कार सोहळ्याच्या वेळी बोलत होते. Christian community
याप्रसंगी काँग्रेस प्रदेश सचिव तथा अध्यक्ष ख्रिस्ती विकास समिती विजय नळे, प्रदेश महासचिव विनोद दत्तात्रय, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष रामू तिवारी, माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी, काँग्रेस नेते करीम भाई, अफसाना सय्यद, छाया मडावी, सुनंदा आत्राम, इस्माईल डाकवाला यांची उपस्थिती होती.
Congress news
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, ख्रिश्चन समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. परंतु त्या प्रत्यक्षात योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे या समाजातील शेवटचा घटक या योजनांपासून वंचित असल्याचे दिसून येते. त्यासोबतच ख्रिश्चन समाजातील तरुणांना नोकरी व शिक्षणात आरक्षण मिळावे. सुशिक्षित बेरोजगारांच्या उद्योग विकासासाठी मदर तेरेसा यांच्या नावावर स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती करावी यासाठी मी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली. यावेळी मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती समाजातील लोकांची उपस्थिती होती. Reservation in education