News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील खैरगाव येथील जिल्हा परिषद शाळा येथे “बाल आनंद मेळावा" Anand mela आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांना व्यवहारिक Practical knowledge ज्ञान मिळावे,त्यांना खरेदी,विक्रीचे व्यवहार कळावे,या उद्देशाने सदर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी vegetables,फळे,खाद्य पदार्थ, खेळण्या, शाळा उपयोगी वस्तू अशाप्रकारे विविध वस्तूंचे स्टॉल लावले होते. सदर उपक्रम कौतुकास्पद असून यामुळे विद्यार्थ्यांच्या व्यवहारिक ज्ञानात चांगलीच भर पडेल असे मत यावेळी व्यक्त होत होते. कार्यक्रमात उपस्थीत पाहुणे तसेच विद्यार्थ्यांचे पालक व नागरिकांनी स्टॉल वरून वस्तू खरेदी करून मुलांचा उत्साह वाढवला.शाळा समिती अध्यक्ष अनिल गेडाम, सदस्य पुरुषोत्तम आस्कर,ममता गेडाम,शिक्षक तसेच कर्मचारी वृंद,पालक व गावातील नागरिकांची या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपस्थिती होती. Zp school