News34 korpana
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील नांदा येथील ration shop रेशन दुकान अंदाजे 1 वर्षापूर्वी संलग्नित करण्यात आले.त्याबाबत रेशनकार्ड धारकांची कोणतीही तक्रार नसून सुरळीतपणे grains distribution धान्य वितरण होत असताना राजकिय स्वार्थासाठी उठाठेव करणारे याभागातील काही व्यक्ती इतर दुकानदाराला दुकान जोडण्याचे आमिष दाखवत असल्याचे बोलले जात असून "कुणाचे दुकान काढणे अथवा देणे" हा प्रकार प्रशासना ऐवजी नेतेच करू लागल्याचे आरोप होत आहे.
राजकिय दबावतंत्राचा वापर करून काही व्यक्ती संबंधीत विभागामार्फत अशा कारवाया करायला लावत असल्याची चर्चा असून यामुळे या भागातील दुकानदारांमध्ये कमालीची नाराजी युक्त दहशत पसरल्याचे चित्र पहायला मिळत आहे.याच पार्श्वभूमीवर नांदा येथील आदर्श महिला परिवार बचत संघ रेशनकार्ड धारकांना नियमितपणे धान्य देत आहे.धान्याचा काळाबाजार होत नसताना केवळ आमची बदनामीचा कट रचला जात असल्याचे मत सदर संघाच्या रेशन दुकानदार सौ.शालू धोटे यांनी व्यक्त केला आहे.Political pressure
आम्ही जानेवारी महिन्याचे मोफत धान्य वितरण केले नसताना आमच्यावर निराधार व बिनबुडाचे आरोप होत आहे.राऊत यांनी मोफत धान्याचे वितरण केले असता वर्तमानपत्रात दिलेली बातमी निर्धार व Defamatory आहे. शासन महिला सक्षमीकरणासाठी विवीध उपक्रम राबवित आहे. मात्र नांदा येथील काही संधीसाधू राजकीय व्यक्ती याला हरताळ फासत असल्याचे मत व्यक्त होत असून संबंधीत विभागाच्या वरिष्ठांनी याप्रकाराकडे जातीने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
