चंद्रपूर - देशात आज अनेक ठिकाणी नंदी, महादेवाची मूर्ती, कासव हे पाणी किंवा दूध पितांनाचे व्हिडीओ समाज माध्यन्मावर व्हायरल होत आहे.
असाच एक प्रकार 5 मार्चला चंद्रपूर शहरात घडला, जटपुरा प्रभागातील वासेकर ले-आऊट मधील नाग मंदिरात सायंकाळच्या सुमारास एक महिला दुधाची वाटी घेऊन गेली असता ती वाटी नंदी बैलाच्या मूर्तीसमोर ठेवली.
मात्र काही वेळात नंदी बैलाच्या तांब्याच्या मूर्तीने अक्षरक्षा वाटी मधील दूध संपवून टाकले.
सदर बाब वाऱ्यासारखी परिसरात पसरली असता महिलांनी त्या नाग मंदिरात मूर्तीला दूध पाजण्याची घाईगर्दी केली.
हा देवाचा miracle आहे, आम्हाला आशीर्वाद दिला देवाने अशी भावना नागरिकांच्या मनात निर्माण झाली.
मात्र त्या मूर्तीने दूध पिले त्यामागे वैज्ञानिक कारण आहे. The scientific reason behind that
एकतर कोणतीही निर्जीव वस्तू पाणी किंवा दूध पिऊ शकत नाही, मात्र समान गुणधर्म असलेले द्रवपदार्थ जेव्हा एकमेकांच्या जवळ येतात तेव्हा पदार्थाच्या थेंबाच्या वरच्या बाजूला अनुरेणूचा असलेला पृष्ठीय थर हा दुसऱ्या त्याच गुणधर्माच्या थेंबाला स्पर्श करतो त्यावेळी तो खेचला जातो. Superstition
मूर्ती स्वतः पाणी खेचते किंवा milk खेचले जाते, नवीन पाण्याचा किंवा दुधाच्या पृष्ठभागाला स्पर्श केला जातो त्यावेळी खेचणाऱ्या प्रक्रियेला सरफेस टेन्शन किंवा पृष्ठीय ताण असे म्हटले जाते. दूध पिणाऱ्या घटना खऱ्या असल्या तरी त्यामागचे कारण मात्र वैज्ञानीक आहे. It's not a miracle
म्हणून हा चमत्कार किंवा आशीर्वाद आहे अश्या अंधश्रद्धा व भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती नेहमी करीत असते.
