News34
कोरपना - तालुक्यातील पारधीगुडा येथे पत्नीने अनैतिक संबंधातून पतीचा गळा आवळून खून केल्याची खळबळ जनक घटना पुढे आली होती.
परंतु या हत्येप्रकरणातील master mind अद्याप ही मोकाट असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. सदर घटना ही कोरपन्यापासून २ कि.मी अंतरावर असलेल्या धोपटाळा (पारधी गुडा) येथे दि.१६मार्च रोजी रात्री ११:३०वाजताच्या दरम्यान घडली.
सुरेखा हिचे अश्विन नन्नावरे याच्याशी अनैतिक संबंध होते, अश्विन आणि सुरेखा हे पळून जाऊन आठ महिने गायब होते, एक महिन्यांपूर्वीच सुरेखा ही मृतक रमेश यांच्या कडे राहायला आली होती.Immoral relations
परंतु पळून नेण्यात व दोघांना सहकार्ये करण्यात राऊत याचा मोठा हात होता, असा आरोप मृतक रमेशच्या लहान भावाने केला आहे, विशेष म्हणजे ज्या दिवशी सुरेखाने रमेशचा गळा आवळून हत्या केली त्यावेळी अश्विन हा गावालगत असलेल्या शेतात रात्रभर एकटाच शेतात दडून बसला होता, मृतक रमेशचा अंत्यविधी झाल्यानंतर तो रात्रीच्या सुमारास गावात आला,त्यामुळे अजूनच संशय बळावला. सदर बाब ही काही नातेवाईकांनी पोलिसांना सांगितली परंतु पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केले, हत्येच्या दिवशी अश्विन रात्रभर शेतात काय करत होता? त्याला कोणी पाठविले? राऊत याचा फोन नॉट रीचेबल कसा येत होता? हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत, आरोपी पत्नी सुरेखावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला, परंतु सदर हत्या प्रकरणातील मास्टर माईंड हे मोकाटच असल्याचा संशय व्यक्त होत आहे,आणि मृतक रमेश याचा लहान भाऊ विजय याला राऊत या व्यक्ती कडून व समर्थकाकडून जीवे मारण्याच्या धमक्या सुद्धा येऊ लागल्या आहे. News34 google news
