News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
संपूर्ण देशाचे आराध्यदैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गडचांदूर येथील पुतळा सौंदर्यीकरणाचे काम गेल्या दोन वर्षांपासून रखडले आहे.येथील न.प.मध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून उदयास आलेल्या शिवसेनेच्या नगरसेवकांनी मात्र कमालीची चुप्पी साधल्याचे दिसत आहे.वास्तविक पाहता यांनी विरोधी म्हणून सक्षम भूमिका वठवत झोपलेल्या सत्ताधाऱ्यांना जागे करण्याची गरज होती. मात्र असे होताना दिसत नाही.
Shivsena
पुतळा सौंदर्यीकरण विषयी यांच्याकडून काही होत नाही तर इतर बाबतीत यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची अशी निराशाजनक चर्चा सध्या शहरात ठिकठिकाणी ऐकायला मिळत आहे. Chatrapati shivaji maharaj Statue
गडचांदूर नगरपरिषदेची दुसरी सार्वत्रिक निवडणूक जाने 2020 रोजी पार पडली.यामध्ये सर्वात मोठा विरोधी पक्ष म्हणून शिवसेना उदयास आला.जनहिताच्या मुद्द्यांवर हे नगरसेवक सत्ताधाऱ्यांना सळो की पळो करून सोडणार अशी जनमानसात चर्चा होती. मात्र दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटूनही दारू दुकानाचा मुद्दा सोडला तर इतर बाबतीत यांनी प्रखर अशी विरोधी भुमीका घेतल्याचे आठवत नसून या उलट मात्र सभापती पद पदरी पाडून सत्ताधाऱ्यांपुढे नमले असे आरोप होत आहे.यांची आजपर्यंतची कामगिरी लक्षात घेता हे विरोधी की, सत्ताधारी हेच समजने कठिण होऊन बसले आहे.दोन वर्षापासून पुतळा सौंदर्यीकरणाचे काम जैसे थे असून याविषयी तरी यांनी आक्रमक भूमिका घ्यायला पाहिजे होती मात्र ही मंडळी गप्प का ? याविषयी अनेक तर्कवितर्क लढविले जात आहे.याच परिस्थितीत दोन वर्षापासून ShivJayanti साजरी केली जात आहे मात्र सौंदर्याकरणा बाबत यांच्याकडून काहिच होताना दिसत नसल्याने शेवटी शिवभक्तांनीच आता शिवरायाच्या पुतळा सौंदर्यीकरणासाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.