चंद्रपूर - चंद्रपूर महानगरातील शीतल मेहता (दामिनी) या 20 वर्षीय तरुणीचा संशयास्पद स्थितीत मृत्यू झाल्यावर,पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. रविवार 20 मार्चला मेहता परिवाराने शितलवर सामूहिक अत्याचार करून हत्या केल्याचा आरोप करण्यात आल्या नंतर सोमवार 21 मार्चला सर्वपक्षीय candle march चे आयोजन करण्यात आले.
News34
News34
या मोर्चाचे नेतृत्व भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष डॉ मंगेश गुलवाडे,महामंत्री सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रवींद्र गुरनुले,महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष अंजली घोटेकर,नगरसेविका शीला चव्हाण, माया उईके,शिवसेनेचे सुरेश पचारे,काँग्रेसचे प्रशांत भरती यांनी केले. Suspicious death
सायंकाळी 6 च्या सुमारास मातोश्री विद्यालय चौकातून निघालेला हा मोर्चा किमान 7 वाजता पोलीस मुख्यालय चौकात पोहोचला. यावेळी महिलांनी पालकमंत्री, महाविकास आघाडी सरकार व पोलीस प्रशासना विरोधात घोषणाबाजी करीत निषेध नोंदविला. तुकुम रोड वरील संविधान चौक येथे शीतल मेहता यांना मौन धारण करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यावेळी उपस्थित मंडळींनी शीतल वर अत्याचार झाल्याचा आरोप करीत पोलीस अपघात झाल्याचे दर्शवित आहेत,कुठल्याही स्थितीत फाईल बंद करू नका. सर्व दिशेने तपास करा अशी मागणी सर्वांनी केली.पुढील 7 दिवसात यावर तोडगा काढा, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
---------------------
शीतलच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा करा - अ.भा. रिपब्लिकन पक्ष
चंद्रपूर शहर कायदा व सुव्यव्यवस्थाबाबत उत्तम शहर म्हणून परिचित होते पण होळीच्या आदल्यादिवशी शीतल नामक युवतीचा प्रेमप्रकरणातून झालेला शेवट चंद्रपूरकराचे मन हेलवणारा आहे. शीतलचा अपघाती मृत्यू झाला असे जरी भासत असले तरी तिचा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. Give justice to the shital
परिस्थितिची गंभीरता लक्षात घेऊन तिला व तिच्या कुटुंबातील सदस्यांना न्याय द्यावा व पोलीस तपासात अंती जे कोणी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे या मागणी साठी मान. पोलिस अधीक्षक साहेब यांना निवेदन अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे पक्षाध्यक्ष प्रवीण खोब्रागडे यांच्या मार्गदर्शनाखाली, महिला जिल्हा अध्यक्ष मृणाल कांबळे, प्रेमदास बोरकर,निर्मला नगराळे,अश्विनी आवळे, अश्विनी खोबरागड, गीता रामटेक, ज्योती शिवणकर, यशवंत मुंजमकर, विजय करमरकर यांच्या शिष्टमंडळनी निवेदन दिले.