चंद्रपूर - "माझ्या कंपनीत इन्व्हेस्टमेंट करा चांगला परतावा मिळणार" असे आमिष दाखवीत तुकूम येथील 36 वर्षीय दीपक आवारी याने एकाची 7 लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. Fraud
फिर्यादीच्या तक्रारींवर आरोपी दीपक आवारी यांचेवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी आवारी यांची राजश्री इन्व्हेस्टमेंट नावाची कम्पनी असून ती ट्रान्स्पोर्टींग शेअर्स खरेदी करीत असते, सदर कंपनीत गुंतवणूक कराल तर दर महिना 10 टक्के परतावा मिळणार असे आमिष आवारी हा नागरिकांना देत असतो.investment fraud
सुमित्रा नगर तुकूम येथील फिर्यादी 37 वर्षीय वीरेंद्र फटींग हे आरोपी आवारी यांच्या आमिषाला बळी पडत त्यांच्या कंपनीत सुमारे 7 लाखांची गुंतवणूक केली.
आवारी यांना पैसे दिल्याचा करारनामा फटींग यांनी लिहून घेतला होता, वर्ष 2012 ला फटींग यांनी पैसे गुंतविले मात्र आजपर्यंत त्यांना फक्त 50 हजार रुपये परतावा म्हणून मिळाले.stock fraud
पैसे परत मिळत नसल्याने फटींग यांनी आवारी जवळ पैश्यांची मागणी केली मात्र त्यांना वारंवार उडवाउडवीची उत्तरे मिळत होती.investment frauds examples
फटींग यांची फसवणूक झाली असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी 31 मे 2021 ला दुर्गापुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपी दीपक आवारीवर 420 कलम अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.investmarkets scam
राजश्री इन्व्हेस्टमेंट कंपनीत कुणी पैसे गुंतविले असल्यास त्यांचे पैसे परत दिले नसेल तर त्या नागरिकांनी दुर्गापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार किंवा संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. News34
