News34 chandrapur (प्रशांत गेडाम)
सिंदेवाही - सिंदेवाही शहरातील चार किमी अंतरावर असलेल्या थकाबाई तलावात मासेमारी साठी गेलेल्या एका व्यक्तीच्या तलावाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला ही घटना दि. 26 मार्च शनिवार ला घडली सविस्तर वृत्त असे की, मृतकाचे नाव शंकर सदाशिव मेश्राम वय 55 रा.सिंदेवाही असे आहे.
Fishing
Fishing
सिंदेवाही शहरापासून चार कि.मी अंतरावरील थकाबाई तलाव आहे या तलावात शंकर मेश्राम हा मासेमारी करण्यासाठी गेला होता. मासेमारी करीत असतानाच तो खोलवर तलावाच्या पाण्यात बुडाल्याने त्याच्या मृत्यू झाला त्याच्या सोबत तलावात मासेमारी करीत असलेल्या काही लोकांना दिसले असता या घटनेची माहिती सिंदेवाही पोलिसांना दिली. Drowned in the lake
हि माहिती कळताच तात्काळ घटनास्थळी सिंदेवाही पोलीस ASI बळीराम गेडाम दाखल झाले. घटनास्थळाचा पंचनामा करून मृतकाचे शवविच्छेदन करण्यासाठी ग्रामीण रुग्णालय सिंदेवाही येथे पाठवले असून पोलिस स्टेशन येथे मर्ग क्र.8/2022 नोंद करून पोलीस हवालदार यशवंत ठोंबरे यांनी तपास नोंदविला आहे.
