News34 chandrapur
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
गडचांदूर येथील माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदूषणामुळे नागरिक त्रस्त आहे.प्रदुषण मंडळ, लोकप्रतिनिधी व मंत्र्यांना निवेदन दिले,आंदोलने केले तरी मात्र डस्ट प्रदुषण (Dust pollution) बंद झाले नाही.अखेर एक कृती समिती तयार करून वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून याकडे शासनाचे लक्ष वेधण्याचे काम सुरू आहे. अशातच गडचांदूर येथे तीन दिवसीय आमदार चषकाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमात माणिकगड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आल्यामुळे गडचांदूरकर चांगलेच चिडले. "प्रदुषित नगरी गडचांदूरात स्वागत" असे मोठमोठे बॅनर प्रदूषण कृती समितीने गावातील मुख्य चौकात लावलेले आहे.हे बॅनर लक्षवेधी ठरत असून सर्वपक्षीय राजकीय नेते, कार्यकर्ते, शिक्षक, पत्रकार, वकील, व्यापाऱ्यांसह शहरातील शेकडो महिला पुरूषांनी उत्स्फूर्तपणे आपापल्या मोबाईलवर स्टेट्स ठेवत माणिकगड सिमेंट कंपनीच्या प्रदुषणाचा निषेध नोंदविला. Polluted city
"गडचांदूर येथील माणिकगड कंपनीचे प्रदूषण कधी थांबणार ? प्रदूषणाने निर्माण झालेला आरोग्याचा प्रश्न कधी मिटणार ? कंपनी प्रशासनाने ईएसपी व डस्ट कंट्रोलर सिस्टीम कार्यान्वित करावी" या आशयाचे बॅनर्स कृती समितीने लावले आहे.एकूणच या संपूर्ण चळवळीत प्रदुषणाचा मुद्दा संपूर्ण राजकीय स्तरावर गाजला.आणि माणिकगड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रदुषण मुक्त गडचांदूर केल्याशिवाय पर्याय राहणार नाही. नाहीतर गडचांदूरचे लोक यांना शहरात येवु देणार नाही, अशाच पद्धतीने यांची नाचक्की करणार आणि अशाच पद्धतीने यांचा अपमान सतत होत राहणार.जर यांना अपमान टाळायचा असेल तर लोकांचे आरोग्य वाचवने यांच्या हातात आहे. Manikgad cement company लोकांचे आरोग्य वाचवावे, प्रदुषण मुक्त गडचांदूर करावे आणि संपूर्ण परिसर हिरवा करावा जेणेकरून लोकांना मोकळा व चांगला श्वास मिळेल अशी इच्छा शहरवासी व कृती समितीकडून व्यक्त होत आहे.प्रदुषणाच्या मुद्द्यावर नागरिकांचा माणिकगड सिमेंट कंपनीच्या अधिकाऱ्याप्रती रोष पाहता आगामी काळात हा लढा आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना आगामी काळात गडचांदूर शहर प्रदुषणमुक्त होणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
