News 34 chandrapur
चंद्रपूर - 16 मार्चला पठाणपुरा बाहेरील चोराला परिसरात 22 वर्षीय शीतल मेहता या तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती.त्यानंतर घडलेल्या घडामोडीवर नागरिकही संतापले, पोलिसांनी या प्रकरणात जाणूनबुजून हलगर्जीपणा केल्याचा आरोप अनेकांनी लावत सदर प्रकरण पोलीस प्रशासन दाबण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप मृतक शीतल च्या कुटूंबियांनी लावला होता.
Justice for shital mehta
शीतल ला न्याय मिळायला हवा यासाठी शहरात अनेक ठिकाणी निषेध नोंदवीत कॅडलं मार्च काढण्यात आला. Candle march
28 मार्चला जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार मृतक शीतलच्या कुटुंबियांची सांत्वन पर भेट घेणार असून सदर प्रकरणात कुणाचा दोष व कुटुंबियांची मागणी काय आहे? या सर्व बाबीवर चर्चा करणार आहे. Subspecies death
पोलिसांनी तरुणीचा मृत्यू हा अपघाती झाला आहे, असे जाहीर करीत आरोपी वाहनचालकाला या प्रकरणी अटक केली होती, मात्र तरुणीच्या कुटुंबियाने सामूहिक अत्याचारनंतर तरुणीचा खून केल्याचा आरोप लावला आहे.
चर्चेनंतर पालकमंत्री वडेट्टीवार या प्रकरणी काय भूमिका घेतात? व पोलीस प्रशासनाला काय निर्देश देणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
