News34
चंद्रपूर : आपले पैसे सुरक्षित असावे, असं प्रत्येकाना वाटत असते, जर ही रक्कम बँकेत जमा केली तर त्यावर चांगला व्याजदर मिळायला हवा मात्र आता बँकेने व्याजदर कमी केल्याने आपल्या जमा रकमेवर परतावा कमी मिळत आहे, मात्र आता पोस्ट ऑफिस मध्ये जमा रकमेवर आकर्षक Interest rate योजनेत वाढ झाली आहे.
चंद्रपूर पोस्टल विभागाने या योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्या यासाठी भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
Indian post payment bank
चंद्रपूर, पोस्टल विभागातर्फे दि .23 मार्च 2022 रोजी कामगार कल्याण मनोरंजन केंद्र मार्केटसमोर सीटीपीएस वसाहत येथे डाक विभागाच्या विविध योजनांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यामध्ये Aadhar Service, इंडिया पोस्ट पेमेंट बँक (नवीन खाते उघडणे, आयपीपीबी (IPPB) खाते त्यांच्या पोस्ट ऑफीस बचत (POSB) खात्याशी जोडणे, AEPS पैसे काढणे, आधार नुतनीकरण, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेत नाव नोंदणी आदी करण्यात येणार आहे.
Sukanya Samrudhi Yojana scheme
त्यासोबतच पोस्ट ऑफिस बचत खाते, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, Atal Pension Yojna Details, My stamps, नवीन पोस्टल विमा तसेच ग्रामीण विमा योजना, गंगाजल विक्री, सुकन्या समृद्धी योजना, भविष्य निर्वाह निधी, किसान विकास पत्र, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, जेष्ठ नागरिक बचत योजना या योजनांचा समावेश आहे. ऊर्जानगर तसेच चंद्रपूर शहरातील सर्व नागरिकांनी आपले ओळखपत्र, (आधारकार्ड, पॅनकार्ड), निवासी पुरावा व 2 पासपोर्ट साइज फोटोसह सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपस्थित राहावे, आणि डाक विभागाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चंद्रपूर डाक विभागाचे प्रवर डाक अधीक्षक यांनी केले आहे.