कार्यक्रमाची सुरवात महिला कर्मचारी श्रीमती उषा मोलगूवार यांचे वतीने स्वागतगीत सादर करुन झाली तदनंतर प्रमुख मान्यवरांचे कारागृहाचे वतीने फुलझाडांचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी कारागृहाचे महिला रक्षक प्रिया नारनवरे यांनी प्रास्ताविकेचे माध्यमातून अतिथींचा परिचय व कार्यक्रमाचा उद्देश याबाबत उपस्थितांना माहिती दिली. तदनंतर Female guard कर्मचारी मीना मडावी यांनी महिलांचे सुख: दुखावर आधारित गीत सादर करुन महिलां प्रती आपल्या भावना प्रकट केल्या. यावेळी चंद्रपूर जिल्हा कारागृहातील बंदी सुरक्षेचे कर्तव्य पार पाडणा-या महिला रक्षक कर्मचारी यांना त्यांचे अविरत सेवबाबत मान्यवरांचे हस्ते पुष्प देऊन गौरविण्यात आले.
यावेळी प्रमुख अतिथी डॉ.मृणाल बंडीवार यांनी महिलांचे आरोग्याबाबत मार्गदर्शन करित उपस्थित महिलांना जागतिक महिला दिनाचे शुभेच्छा दिल्या. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पॅनल ऍड.आम्रपाली लोखंडे यांनी महिला बंद्यांना भारतीय संविधान व महिला विषयक महत्वाच्या कायद्यांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी कारागृह अधीक्षक श्री. वैभव आगे यांनी उपस्थित महिला कर्मचारी व महिला बंदी यांना प्राचिन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत विविध महिलांनी केलेल्या सुधारकार्याबाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव श्री. जाधव साहेब यांनी महिला बंद्याना भारतीय समाजातील महिलांचे अमुल्य योगदान याबाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमामध्ये दोन महिला बंदी यांनी जागतिक महिला दिनाचे निमित्ताने इंग्रजी व हिंदी भाषेमध्ये आपले मनोगत उत्कृष्टरित्या सादर करुन उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. तदनंतर महिला कर्मचारी यांचे वतीने श्रीमती माधुरी नन्नावरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे यशस्वी सुत्रसंचलन महिला कर्मचारी श्रीमती माधुरी मेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वितेसाठी तुरुंगाधिकारी श्री. महेशकुमार माळी, तुरुंगाधिकारी श्री. सुनिल वानखडे, तुरुंग शिक्षक ललित मुंडे व कारागृहाचे महिला कर्मचारी यांनी विशेष योगदान दिले.