News34
चंद्रपूर - चंद्रपूर येथील चांदा शिक्षण प्रसारक मंडळ, व्दारा संचालित जनता महाविद्यालयातील सांस्कृतिक समिती व जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ग्राहक दिवस साजरा करण्यात आले. या निमित्ताने महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी जागतिक ग्राहक दिनाच्या संकल्पनेवर आधारित रांगोळी स्पर्धा तर "ऑनलाईन शॉपींगचे फायदे आणि तोटे" या विषयावर essay writing निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
online shopping
वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन संस्थेचे सचिव डॉ. अशोक जिवतोडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले असून ते कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन collector chandrapur चंद्रपूर चे जिल्हाधिकारी मा.श्री. अजय गुल्हाणे यांच्या हस्ते करण्यात आले. जनता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. सुभाष, प्रमुख संयोजक म्हणुन तर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष श्री अतुल अळशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीमती विद्यूत वरखेडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. शालीकराम भराडी, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख ग्राहक पंचायत श्री. स्वपन दास, मान्यवर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते.
advantages and disadvantages
मा. जिल्हाधिकारी यांनी आपल्या मार्गदर्शनातुन ऑनलाईन शॉपिंग करतांना ग्राहकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तर डॉ. अशोक जिवतोडे यांनी वेगवेगळया माध्यमातुन ग्राहकांची होणारी फसवणुक कश्या रितीने होते हे समजावुन सांगितले.online store
कार्यक्रमाचे संचालन सांस्कृतिक समितीचे समन्वयक डॉ. आय. एस. कोन्ड्रा, प्रास्ताविक शालिकराम भराडी तर आभार प्रदर्शन डॉ. ज्योती पायघन यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री. भारतकुमार तुबडे, उपप्राचार्य डॉ. आशिष महातळे, डॉ. एन. आर. बेग, डॉ. दिपिका संतोषवार, डॉ. मनिषा महातळे, डॉ. पी.बी. महानंदे, डॉ. विजय वानखेडे, डॉ. प्रशांत चहारे, डॉ. रणजित तानखेडे, डॉ. राजेश पत्तीवार सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.
