News34
गडचांदूर सै.मूम्ताज़ अली:-
कोरपना तालुक्यातील धोपटाळा(पारधीगुडा) येथे एका पत्नीने आपल्या पतीचा गळा आवळून हत्या केल्याची घटना समोर आली आहे.अनैतिक संबंधातून सदर हत्या करण्यात आल्याची शंका व्यक्त होत असून पत्नी विरोधात पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे कळते.परंतू या हत्येमागचा मुख्य सूत्रधार दुसराच असल्याची शंका व्यक्त होत असून याविषयी विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे. सदर घटना 16 मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती आहे. Murder from a love affair
आरोपी महिलेचे एका व्यक्ती सोबत अनैतिक संबंध होते आणि अंदाजे 8 महिन्यापूर्वी ही महिला आपल्या प्रियकरासोबत पळून गेल्याची व एक महिन्यापूर्वीच पुन्हा पतीकडे परत आल्याची माहिती आहे.असे असताना येथील एका व्यक्तीने या दोघांना पळून जाण्यासाठी सहकार्ये केल्याचा आरोप मृतकाच्या लहान भावाने केला आहे. मात्र तो व्यक्ती कोण ? याचा तपास केल्यास सत्य बाहेर येऊ शकते असे मत व्यक्त होत आहे. Immoral relations
ज्यादिवशी हे हत्याकांड घडले त्या रात्री आरोपी महिलेचा तो प्रियकर एकटाच रात्रभर गावा लगतच्या शेतात दडून बसला होता. आणि तो दुसऱ्या दिवशी रात्रीच्या सुमारास गावात आला. Follow us google news
सदर संशयास्पद बाब मृतकाच्या नातेवाईकांनी पोलिसांच्या लक्षात आणून दिली मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे आरोप होत आहे.कोरपना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. Intimate relationship