बल्लारपूर - शहरातील गौरक्षण वार्डात राहणारा 27 वर्षीय कुणाल अजय चौहान या युवकाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाला. News34
मात्र कुणाल होळीची पार्टी म्हणून आपल्या मित्रांसहित कोर्टी मक्ता येथील शेतात गेला. (Follow On Google news)
सोबत होळीच्या रंगात नाचण्याचा उत्साह म्हणून सोबत डीजे नेला मात्र डिजेचे हुक लावताना कुणाल ला विजेचा जोरदार धक्का बसला. Dj sound
हुक लावताना कुणाल चे कपडे ओले असल्याने तो विजेच्या संपर्कात आला. Holi festival
मित्रांनी लगेच कुणाल ला खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा प्रयत्न केला मात्र वाटेत त्याचा मृत्यू झाला.
मागील 2 वर्षांपूर्वी कुणाल हा वेकोली मध्ये मायनिंग सरदार या पदावर कार्यरत होता.
त्याच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
डीजे वाद्य वाजविण्यास बंदी असताना धुलीवंदनाच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात डीजे च्या तालावर युवकांनी रंगीत तालीम करीत धिंगाणा केला.