News34 chandrapur
मूल - (गुरू गुरनुले) : गिट्टि भरून भरधाव वेगाने जात असलेल्या क्रमांक MH40 CD 4486 हायवाने क्रमांक MH 33 AK 4142 या दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाल्याची घटना मूल पासून 3 की.मी.अंतरावर असलेल्या येथील uma river जवळ टि पाईंट वर दुपारी 4 वाजता दरम्यान घडली.
गडचिरोली जिल्हयातील कोटगल येथील नरेश दिलीप ठाकरे वय 26 वर्षे. सिंधु दिलिप ठाकरे वय 34 वर्ष.देवाजी चिमा कांबळे वय 58 वर्ष तिघे जण लग्नासाठी आले होते. Truck hit two wheeler
मूलवरून दुचाकीने परत जात असताना उमा नदी जवळील टि पाईंट जवळ गिट्टि भरून भरधाव वेगाने जात असलेल्या हायवाने समोरा समोरून विरूद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले आहेत. हायवाची दुचाकी जोरदार धडक बसल्याने दुचाकी अक्षरशः चकनाचुर झाली आहे. मात्र संधी साधून हायवा ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झालेला आहे. Terrible accident
जखमीना मूल येथील उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले असुन घटनास्थळी मूल पोलिस पंचनामा करून पुढील तपास करीत आहे.