News 34 chandrapur
चंद्रपूर - 16 मार्चला चोराला येथे तुकूम परिसरातील 22 वर्षीय शीतल मेहता या मुलीचा संशयास्पद मृत्यूने एकच खळबळ माजली आहे.
पडोली पोलिसांनी सदर मुलीचा मृत्यू हा अपघाताने झाला असल्याचे सांगितले व या प्रकरणी आरोपी वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मात्र मृतक मुलीच्या कुटुंबीयांनी शीतल चा मृत्यू नसून घातपात असल्याचा आरोप करीत पोलिसांनी याबाबत निष्पक्ष चौकशी करावी अशी मागणी केली आहे.
23 मार्चला मृतक शीतलला न्याय मिळावा याकरिता सर्वपक्षीय शिष्टमंडळाने जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांची भेट घेतली.
सर्वपक्षीय शिष्टमंडळाने यावेळी शीतलच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित केल्या, तो मृत्यू अपघाती नसून आधी सामूहिक अत्याचार व नंतर हत्या असा घातपात शितलवर झाला असल्याची दाट शक्यता वर्तविली आहे. Suspicious death
पोलिसांनी वरिष्ठ तपास अधिकारी नेमून या प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी यावेळी केली.
शिष्टमंडळाने यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक साळवे यांच्यासमोर सदर शंका उपस्थित केल्या.
Chandrapur police
१) मृत मुलीची मैत्रीण मुख्य साक्षीदार की सह आरोपी?
२) ज्याप्रकारे कु. शितल मेहता हिचा मोबाईल पोलिसांनी जप्त करून ठेवला त्याच प्रकारे मृतक मुलीचा प्रियकर अभिषेक देशभ्रतार व मैत्रीण कु. सोनाली चव्हाण व अक्षय चव्हाण तथा इतर घटनेत सामील असलेल्या संशयितांचा मोबाईल घटनेची सत्यता तपासण्या करितात का जप्त केला नाही?
३) मुलीच्या वाहनाला कुठलीही हानी नाही.
४) आरोपी मुलीचा प्रेमी अभिषेक देशभ्रतार मोकाट का?
Justice for shital
५) मुलगी तिची दुचाकी (Deo) रस्त्या काठी ठेऊन प्रियकर अभिषेक देशभ्रतार याच्या बुलेट वर गेली होती मग अपघातात मुलगीच कशी मेली ? मुलाला अथवा त्याच्या दुचाकी बुलेटला काहीच नुकसान का झाले नाही.?
६) मुलगा सारखा मृत मुलीवर संशय करीत होता व त्रास देत होता अशी कबुली सोनाली चव्हाण हिने भ्रमणध्वनी वर चर्चा करीत असताना दिली आहे. तसेच मला सर्व माहीत आहे असे देखील कबुली तिने दिली आहे ... मग तिला अजून पर्यंत पोलीस प्रशासनाकडून विचारपूस का करण्यात आली नाही ?
७) पोलिसांकडून तपास काढून सी बी आय /सी. आय. डी. कडे द्यावा ही आमच्यासह पीडित परिवार व समस्त तुकूम वार्ड वासियांची मागणी.
Negligence in investigation
८) तपासात हलगर्जी पना केल्यामुळे पडोली पोलीस निरीक्षकांवर अद्याप निलंबनाची कार्यवाही का नाहीं.
९) अपघात नसून सुनियोजित कट व बलात्कार करून मारण्यात आल्याचा कुटुंबीयांचा आरोप आहे. त्यास मुलीचे मरणानंतर चे खाजगी भागातील छायाचित्र हे पुरावे आहेत.
१०) शवविच्छेदन हे १२ तासाच्या आत करणे अत्यावश्यक असताना देखील पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून शवविच्छेदनाला उशीर करण्यात का आला? तसेच तरुणीच्या प्रेमी वर बलात्काराचा संशय तरुणीच्या घरच्यांनी व्यक्त केला असताना देखील त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात का आली नाही? यामुळे संबंधित पोलिस अधिकाऱ्यांवर पुरावा नष्ट केल्या अंतर्गत गुन्हा दाखल करून निलंबित करण्यात यावे.
११) सदर घटनेतील तरुण-तरुणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्यामुळे त्यांचा बचावाकरीता पोलीस प्रशासन प्रकरणाची सत्यता उघडकीस न आणून प्रकरण दाबण्याचा तर प्रयत्न करीत नाहीं ना?
कारण अपघात झाल्याचा कुठलाही पुरावा नसताना देखील जाणीवपूर्वक अपघात झाल्याची तक्रार लिहिली. परंतु पंचनाम्या दरम्यान मुलीच्या खाजगी अंगातून रक्तस्त्राव होत असताना व घटनास्थळी चादर, बेडशीट, कंडोम चे पॉकेट आढळून आले असतांना देखील तक्रारीमध्ये बलात्काराचा उल्लेख कुठेही का बर करण्यात आलेला नाही?
११) अभिषेक देशभ्रतार याची बुलेट गाडी पोलिसांनी जप्त का केली नाही ?
१२) कुमारी शितल मेहता हिला ज्या काळ्या रंगाच्या हुंदाई एसेंट गाडीमध्ये सोनाली चव्हाण चा भाऊ व अभिषेक देशभ्रतार हे विविध रुग्णालयांमध्ये घेऊन फिरत होते ती काळ्या रंगाची असेंट कार पोलिसांनी घटनेच्या तपासाकरिता जप्त का केली नाही?
१३) बोलेरो चालकाला अटक करण्याची घाई का करण्यात आली व अटक केल्यानंतर तात्काळ जामिनावर कसे काय सोडण्यात आले.
१४) शवविच्छेदन अहवाल येण्याआधीच अपघात झाला असे निष्कर्ष लावून बोलेरो चालकाला अटक करून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पडोली स्टेशन चे पोलीस निरीक्षक कोंडावार यांनी कुणाच्या सांगण्यावरून केला आहे.
१५) कुमारी शितल मेहता चा मोबाईल कुठल्याही प्रकारची छेडछाड न करता मोबाईल मधील व्हाट्सअप, INSTAGRAM, FACEBOOK, SMS, ई-मेल, मेसेंजर यामधील आलेल्या - पाठविलेल्या सर्व एसएमएस कॉल्स ई-मेल डिलीट न करता तात्काळ पारिजनाच्या सुखरूप स्वाधीन करावा.
शीतल मेहता या मुलीच्या मृत्यूबद्दल अनेक शंका उपस्थित झाल्या मात्र पोलिसांचा तपास वेगळ्या दिशेने तर जात नाही असा संशय सर्वपक्षीय शिष्टमंडळाने व्यक्त केला आहे.
पोलिसांनी प्रत्येक लहान बाबी तपासायला हव्या होत्या मात्र तपासात हलगर्जीपणा झाला ही बाब सत्य आहे.
यावेळेस उपस्थित पीडितेचा भाऊ नितेश मेहता, शेजारी कु. शुभांगी काकडे, सुभाष कासनगोट्टूवार, नगरसेवक भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर, सुरेश पचारे, नगरसेवक, शिवसेना ,चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात राहुल चव्हाण, ब्रिजभूषण पाझारे, भारतीय जनता पार्टी, रवी गुरनुले, माजी नगरसेवक भारतीय जनता पक्ष, सौ. प्रतिमाताई ठाकूर, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर, पुरुषोत्तम सहारे, सौ.मंजुश्री सुभाष कसंगगोट्टूवार, सौ. प्राध्यापक- प्रज्ञाताई बोरगमवार, सौ. वनश्री मेश्राम, वैभव मेश्राम, वैभव येनपल्लीवर, प्रिन्स रामटेके, प्रियांशु सलामे, नयन मडावी आदी सहकारी उपस्थित होते.