News34
गडचांदूर/सै.मूम्ताज़ अली:-
उत्तर प्रदेश,गोवा,मणिपूर आणि उत्तराखंड या चार राज्यांतील विधानसभा निवडणूकीत भारतीय जनता पार्टीने अभूतपूर्व व उल्लेखनीय असा यश संपादन केल्याल्याबद्दल कोरपना तालूका व गडचांदूर शहर भाजपच्या वतीने गडचांदूर शहराध्यक्ष सतीश उपलेंचीवार यांच्या नेतृत्वात येथील संविधान चौकात फटाके फोडून व मिठाई वाटप करून विजय जल्लोष साजरा करण्यात आला.
Bjp celebrate
भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अक्षरशः डिजेच्या तालावर नृत्य करून नागरिकांना आकर्षित केले.या जल्लोषात उपलेंचीवार यांच्यासह गडचांदूर न.प.नगरसेवक अरविंद डोहे, नगरसेवक रामसेवक मोरे,माजी नगरसेवक नीलेश ताजने,संजय मुसळे,हरी घोरे, सुयोग कोंगरे,राकेश अरोरा इत्यादी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. Election victory
