चंद्रपूर - मागील 6 दिवसापासून शहरातील पाणी पुरवठा ठप्प आहे. त्यामुळे नागरिकांना तपत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. फुटलेल्या पाईपलाईनचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याने ही परिस्थिती उद्भवली असून. सदर दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करून 24 तासात शहरातील पाणी पुरवठा सुरळीत करा अन्यथा महानगरपालिकेला टाळे ठोकू असा इशाराच Mla Kishor Jorgewar आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
Rising temperatures
आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरण येथे सूरु असलेल्या पाईप लाईन दुरुस्तीच्या कामाची पाहणी केली. यावेळी संथ गतीने सुरू पाईप दुरुस्तीच्या कामाबाबत त्यांनी संतापही व्यक्त केला.
यावेळी मनपा उपायुक्त अशोक गराटे, मनपा अभियंता जोगी, यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युथ शहराध्यक्ष कलाकार मल्लारप, युवा नेते पंकज गुप्ता, अमोल शेंडे, जितेश कुळमेथे, सविता दंडारे, विमल काटकर, राम जंगम, विलास वनकर, राशेद हुसेन, नकुल वासमवार, भाग्यश्री हांडे, आदींची उपस्थिती होती. Young chanda brigade
शहरातील पाणी पुरवठा खंडित असल्याने नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहे. दर उन्हाळ्यात चंद्रपूर शहरात उद्भवनाऱ्या या परिस्थितीला मनपा प्रशासनाचा नियोजन शून्य कारभार जबाबदार आहे. असा आरोप आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. आज सोमवारी आमदार किशोर जोरगेवार यांनी इरई धरणाच्या फुटलेल्या पाईप लाईनच्या कामाची पाहणी केली. यावेळी सदर काम कासव गतीने सुरू असल्याचे लक्षात येताच आ. जोरगेवार यांनी चांगलाच संताप व्यक्त केला. Terrible water problem in Chandrapur city
नागरिकांची भर उन्हात पाण्यासाठी लाईलाई होत असतांना मनपा प्रशासन इतके सुस्त असणे हे योग्य नाही. अशा शब्दात यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी रोष व्यक्त केला. जेसीबी मशीन वाढवा, मनुष्यबळ वाढवा, युद्ध पातळीवर काम करा अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिल्या आहे. तसेच 24 तासात पाणी पूरवठा सुरू न झाल्यास महानगर पालिकेला कुलूप ठोकण्याचा इशाराही यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपा प्रशासनाला दिला आहे.
