News 34 chandrapur
चंद्रपूर - मनसेच्या १६ व्या वर्धापनदिनी पुण्यात पक्षाध्यक्ष यांनी आपल्या मनसैनिकांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही आपण ज्याप्रमाणे सर्व सण तिथीनुसार साजरा करतो, त्याचप्रकारे शिवजयंतीसुद्धा तिथीनुसार साजरी करण्याचे आवाहन केले. राज ठाकरे यांच्या आवाहनाच पालन त्यांच्या मनसैनिकांनी तंतोतंत करत उत्साहात शिवजयंती साजरी केली. Mns chandrapur
Shiv jayanti
Shiv jayanti
यानिमित्य चंद्रपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून हजारो दिव्यांनी दीपोत्सव साजरा करण्यात आला. हजारो दिव्यांनी परिसर उजळून निघाला. छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूजन करीत शिवगर्जना देत फटाक्याची आतिषबाजी यावेळी करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार व महिला सेना जिल्हाउपाध्यक्ष शोभाताई वाघमारे यांनी केले. Mns adhikrut
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष दिलीप रामेडवार, महिला सेना जिल्हाध्यक्ष सुनिता गायकवाड, विधानसभा संघटक महेश शास्त्रकार, नगरसेवक सीमा रामेडवार, विधानसभा सचिव किशोर मडगुलवार,विद्यार्थी सेना जिल्हाउपाध्यक्ष कुलदीप चंदनखेडे, मनसे तालुकाअध्यक्ष प्रकाश नागरकर, संघटक मनोज तांबेकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, ग्रापं सदस्य निशिकांत पिसे, ग्रापं सदस्य नितीन टेकाम, नितेश जुमडे,सुयोग धनवलकर,अक्षय चौधरी, पियुष धुपे, राज वर्मा, वानी सादलावार, कृष्ण गुप्ता, शुभम वांढरे व शेकडो महिला व महाराष्ट्र सैनिक यावेळी उपस्थित होते.