News 34 chandrapur
चंद्रपूर - महावितरण नागपूर प्रादेशिक कार्यालयाचे प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांनी वरोरा विभागास भेट दिली व घरगुती, वाणिज्यिक कृषि, आदी. उच्चदाब व लघूदाब वीजग्राहकांच्या थकबाकी व वसुलीचा आढावा घेत ३१ मार्च पर्यंत थकबाकी व चालू वीजबिलाची थकबाकी वसूल करण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी मुख्य महाव्यवस्थापक वि व ले. श्री. शरद दाहेदार, नागपूर यांच्या उपस्थितीत पारस ॲग्रो यांनी ६ लाख १४ हजार, रवीकमल कॉटेक्स यांनी ४ लाख १९ हजार, सना मिनरल्स १ लाख् २ हजार अशा बडया ग्राहकांनी तसेच सरकारी कार्यालयांपैकी बी.डी.ओ. पंचायत समीती वरोरा श्री. राठोड यांनी ४९ हजार ६०० तर प्राथमिक उपचार केंद्र नागरी यांनी १८ हजार रुपये प्रादेशिक संचालक श्री. सुहास रंगारी यांच्या हाकेला साद देत एकरकमी थकबाकीचा भरणा चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे यांच्या उपस्थितीत केला. यांप्रसंगी, चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंत्या श्रीमती संध्या चिवंडे, वरोरा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. सचिन घडोले हे उपस्थित होते.
msedcl
महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरोली जिल्हयातील घरगुती, वाणिज्यिक, औदयोगिक, सरकारी कार्यालये, सार्वजनिक पाणिपुरवठा योजना व पथदिव्यांची थकबाकी ४६९ कोटी ३ लाखाच्या घरात पोहेाचल्याने थकबाकीदारांविरोधात वसुली व वीजपुरवठा खंडीत करण्याची मोहिम राबविण्यात येत असून ग्राहकांनी वीजबिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करण्याचे कळकळीचे आवाहन करण्यात येत आहे. महावितरणच्या चंद्रपूर परिमंडळात चालू वर्षातील व मागील वर्षाच्या एकंदरीत मागणीपैकी घरगुती ग्राहकांकडुन १५ कोटी २१ लाख येणे आहे. तर वाणिज्यिक गाहकांकडुन ४ कोटी ७६ लाख आहे. औदयोगिक ८ कोटी ७३ लाख थकबाकी वसुली येणे आहे. कृषिपंपधारक यांच्याकडून २२३ कोटी २९ लाख, ग्रामीण व शहरी पाणीपुरवठा योजनांकडून तर ग्रामिण व शहरी पथदिवे यांच्याकडून २०९ कोटी ९७ लाख येणे आहेत. त्यामुळे घरगुती ग्राहकांसोबतच आता पाणीपुरवठा योजना (Water supply scheme), पथदिवे, थकबाकीत असलेले सरकारी कार्यालये, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था व तत्सम थकबाकीदार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात येत आहे. ३१ मार्च जवळ येत असल्याने वसुली मोहिमेला गती मिळाली असून सर्व अधिकारी, कर्मचारी वसुलीसाठी सरसावले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाल्यास सामान्य जनेतेची असुविधा थकबाकी न भरल्या गेल्यामुळे ओढावणार आहे. (Arrears)
महावितरणच्या अस्तित्वासाठी ग्राहकांनी वापरलेल्या प्रत्येक युनिटची वसुली अत्यावश्यक असून वसुल केलेल्या पैशातूनच वीजखरेदी करून महावितरण ग्राहकांप्रति जबाबदारी पार पाडत वीजखरेदी करून वीजपुरवठा करीत आहे ही वस्तुस्थिती आहे. वीजबिल वुसलीतून प्राप्त पैश्यामधून ८५ टक्के रककम वीजखरेदीवर केली जाते. महावितरण प्रथम वीजपुरवठा करते व नंतर वीजबिल देते. या उलट अनेक सेवासांठी आधी पैसे व नंतर सेवा असे असते. तरी पण वीजकंपनीच्या अभियंता कर्मचारी वर्गास मारहान, अपमान सहन करून ग्राहकांनी वेळेत वीजबिल भरण अपेक्षित असतांना वसुलीसाठी त्यांच्या दारी जावे लागते. वीजग्राहकांना २४ तास वीजपुरवठा मिळावा यासाठी महावितरण वीज निर्मिती कंपण्याकडून वसुल झालेल्या पैशातूनच वीज खरेदी करत असते. वीज निर्मिती कंपन्या कोळसा, नैसर्गिक तेल वीजनिर्मितीसाठी खरेदी करतात व त्यांनापण कोळसा व तेल कंपण्यांना पैसे देणे लागतात.
नुकतेच ग्राहकांची गैरसोय टाळत ग्राहकांच्या मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत दि. ८ फेब्रुवारी महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला. तर दि. १५ मार्च रोजी मागणीप्रमाणे तब्बल २३ हजार ६०५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित वीजपुरवठा (Uninterrupted power supply) केला.
मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला. या परिस्थितीत विजेची विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन (load shedding) करण्यात आलेले नाही व तशी गरज भासणार नाही याबाबत काळजी घेतली जात आहे.
महावितरण ग्राहकांची काळजी घेत विविध पायाभूत कामे करुन त्यांना प्रसंगी खुल्या बाजारातून वीज खरेदी करुन वीजपुरवठा करते. परंतु वसुलीच झाली नाही तर हे चक्र पूर्णपणे कोलमडणार. तेव्हा सुजान ग्राहकांनी थकबाकी भरून महावितरण या आपल्याच कंपनीला सहकार्य करावे हे कळकळीचे निवेदन मुख्य अभियंता श्री.सुनिल देशपांडे केले आहे.
चंद्रपूर व गडचिरोली मंडलातील व ग्राहक निहाय चालू व मागील वर्षातील एकूण थकबाकी
ग्राहकांची वर्गवारी चंद्रपूर मंडल गडचिरोली मंडल एकूण थकबाकी
घरगुती ९ कोटी ७३लाख ५ कोटी ४८ लाख १५ कोटी २१ लाख
वणिज्यिक ३ कोटी ८२ लाख ९४ लाख् ४ कोटी७६ लाख
औदयोगिक ६ कोटी ३१ लाख २ कोटी ४२ लाख ८ कोटी ७३ लाख
ग्रामिण/ शहरी पाणीपुरवठा येाजणा १ कोटी ७२ ९२ लाख २ कोटी ६४ लाख
शासकिय कार्यालये व इतर १ कोटी ८१ लाख २ कोटी ६३लाख ४ कोटी ४४ लाख
कृशिपंधारक ११२ कोटी ७५ लाख ११० कोटी ५४ लाख २२३ कोटी २९ लाख
ग्रामिण व षहरी पथदिवे ७६ कोटी ८ लाख १३३ कोटी ८९ लाख २०९ कोटी ९७ लाख
एकूण थकबाकी २१२ कोटी २२ लाख २५६ कोटी ८२ ४६९ कोटी ३ लाख