News 34 chandrapur
चंद्रपूर - पदभरती घोटाळा व सतत सुरू असलेली चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील अनियमितता यावर कांग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी लोकसभा अधिवेशनात शून्य प्रहरात 13 मार्च ला प्रश्न उपस्थित केला होता, सदर प्रश्नाबाबत व बँकेत सुरू असलेल्या घोळाबद्दल 21 मार्चला देशाचे गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांच्यासोबत खासदार धानोरकर यांनी प्रत्यक्ष भेटत चर्चा केली. Cdcc bank chandrapur
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत पदाधिकारी यांचा 2012 ते 17 त्यांनातरही 5 वर्षाचा कालावधी संपल्यानंतरही प्रशासक नेमला नाही.
सर्वोच्च न्यायालयाने 18 फेब्रुवारीला कालावधी संपलेल्या सहकारी बँकांवर प्रशासक नेमण्याचे आदेश जारी केले होते, प्रशासक नेमल्यावर काही काळानंतर निवडणुका घेण्यात यावा मध्यंतरी कोणतेही धोरणात्मक निर्णय घेऊ नये असेही न्यायालयात तर्फे जारी करण्यात आले मात्र त्यानंतरही जिल्हा बँकेतील पदाधिकाऱ्यांनी सर्वसाधारण सभा घेतल्या.
भविष्यात विरोधक संचालक मंडळावर जिंकता कामा नये असे पोटनियम दुरुस्ती केले.
बँकेच्या रेकॉर्डमध्ये मोठ्या प्रमाणात खोडसाळ करण्यात आली.
मागे घेण्यात आलेल्या नोकर भरतीमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झाल्यानंतरही पुन्हा नोकर भरतीची मागणी करण्यात आली.
नव्याने बँकेसाठी जागा व बांधकामे करण्यात आली.
महिला बचत गटांच्या संगोपनासाठी 200 महिलांना रोजंदारी पणे दाखवीत बँकेतून त्यांचा पगार काढण्यात आला.
बँकेतील सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पदाधिकाऱ्यांनी आपला सल्लागार बनवीत त्यांना 25 हजार पगार देण्यात आला.
खाजगी बँकेत तब्बल 500 कोटींची गुंतवणूक करण्यात आली.
माजी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या तक्रारींवर काहीही कारवाई करण्यात आली नाही.
केंद्र सरकारच्याया विविध योजनांची अंमलबजावणी करण्यास बँकेने नेहमी टाळाटाळ केली.
शेतकरी कल्याण निधीचा केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना असतानाही फक्त राजकीय हेतूने जिल्ह्यातील 5 तालुक्यात 58 लाखांपैकी 50 लाख रुपये वितरित करण्यात आले.
आर्थिक गुन्हा दाखल असलेल्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली.
सदर गैरकृत्यात सहभागी असणाऱ्या संचालक मंडळ, सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी व प्रशासन विभागाचे अधिकारी यांची चौकशी करण्यात यावी या सर्व मुद्द्यांवर धानोरकर यांनी सहकार मंत्री अमित शाह यांचेशी चर्चा केली. Congress versus Congress
सर्व बाबींवर विस्तृत चर्चा केल्यानंतर गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांनी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची सीबीआय चौकशी करण्यात येणार असे आश्वासन खासदार धानोरकर यांना दिले.
सध्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेवर कांग्रेस पक्षाचे नेते संतोष रावत हे अध्यक्ष आहे, मात्र खासदार धानोरकर यांच्या या आरोपामुळे कांग्रेस कमालीची अडचणीत येण्याची शक्यता आहे. Meeting of mp Balu Dhanorkar and home minister Amit Shah
संतोष रावत हे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचे खंदे समर्थक आहे, काही दिवसांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीवर धानोरकर समर्थक दिनेश चोखारे यांना पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या पत्राने पदावरून पायउतार व्हावे लागले, आता वडेट्टीवार समर्थकावर धानोरकरांचा हल्लाबोल सुरू झाला असून कांग्रेसचं कांग्रेसचा पाय खेचण्याच्या तयारीत आहे. Cbi investigation
जिल्ह्यात अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे गाजली मात्र त्यावर धानोरकर यांनी ब्र सुद्धा काढला नाही मात्र आता बँकेत अनियमितता व भ्रष्टाचार झाला असे त्यांच्या निदर्शनास आले.