नागपूर - केंद्रीय सेवा कर म्हणजेच गुडस् सर्व्हिस टॅक्स (CGST) ची चोरी पकडण्याकरिता सरकार आता सजग झाले आहे, सध्या टॅक्स ची चोरी करणे मोठ्या प्रमाणात अवघड झाले आहे, मात्र टॅक्स घेणारेचं आता टॅक्स चोरांना साथ देऊ लागले आहे.
CBI च्या Anti Corruption विभागाने नागपूर CGST विभागाचे Joint Commisionar मुकुल पाटील यांना 4 लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे.
ही लाच पाटील यांनी CA च्या माध्यमातून स्वीकारली.
यवतमाळ येथे जयंत चौपाने यांचं जय Electricals & electronic नावाची कम्पनी आहे, या कंपनीच्या सेवा कराचा निपटारा (service tax liability settel) करण्यासाठी तब्बल 4 लाख 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी मुकुल पाटील यांनी केली होती. सदर पैश्यांची मागणी पाटील यांनी CA हेमंत राजदांडेकर यांच्या माध्यमातून केली.
तक्रारदाराला पैशे देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी याची तक्रार CBI च्या ANTI CORRUPTION विभागाकडे केली.
तक्रारीची पडताळणी उपअधीक्षक चौगुले यांनी केल्यावर 3 मार्चला सापळा रचण्यात आला असता 4 लाख रुपये स्वीकारताना CA राजदांडेकर व मुकुल पाटील यांना CBI च्या चमूने अटक केली.
सदर कारवाई नीरज गुप्ता, पोलीस निरीक्षक कल्याणी हुमने, तिवारी, राठोड, तपासणी पथकातील पोलीस निरीक्षक सिंग, पोउपनी मनोज कुमार, रवी खाटीक, तपासणी पथक 2 मधील उपअधीक्षक वर्मा, पोलीस निरीक्षक विजय कुमार व चैतन्य यांनी यशस्वीपणे पार पाडली.